Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
फुटबॉल स्पर्धेतून शिवाजी तरुण मंडळाची माघारचंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ, दिलबहार तालीम मंडळ विजयीगल्लीतील भांडणसारखे दोन गटनेते महापालिकेत भिडले ! शारंगधर देशमुख - आदिल फरासांत पुन्हा घमासान ! !सांगलीत भाजप चितपट, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष- उपाध्यक्षपदी महाविकास आघाडी विजयी !सीईओची ताराराणी महोत्सवाला भेट, बचत गटाकडून वस्तूंची  खरेदीगोकुळतर्फे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण, शेतकऱ्यांना होणार थेट लाभजिपचे पदाधिकारी, पंचायत समिती सभापतीसाठी नवीन वाहन, अंदाजपत्रकात चार कोटीची तरतूदजुनी पेन्शनसाठी शुक्रवारपासून आंदोलन, शैक्षणिक व्यासपीठ - मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा जिप अध्यक्ष- उपाध्यक्षपदी शिल्पा खोत, तानाजी पाटील बिनविरोध! काँग्रेसची माघार!!माजी विद्यार्थ्याने मिळवले यूपीएससीत यश, शाळेने केले मिरवणुकीद्वारे जल्लोषी स्वागत

जाहिरात

 

जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार, अर्ज दाखल

schedule17 Mar 26 person by visibility 255 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक काँग्रेस लढविणार आहे. काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी सदस्या रसिका अमर पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर उपाध्यक्षपदासाठी सदस्य संभाजी पाटणकर हे उमेदवार आहेत. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सेनापती कापशी येथील सदस्या शिल्पा शशिकांत खोत तर उपाध्यक्षपदासाठी भारतीय जनता पक्षाचे गडमुडशिंगी मतदारसंघातील सदस्य तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्हा परिषदेची एकूण सदस्य संख्या ६८ इतकी आहे. यामध्ये महायुतीची सदस्य संख्या ५१ तर काँग्रेसची सदस्य संख्या १५ इतकी आहे. मंगळवारी, १७ मार्च रोजी दुपारी दोन वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी सभा होत आहे. सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. दुपारी सभेला सुरुवात झाल्यानंतर अर्ज माघारीसाठी पंधरा मिनिटाचा कालावधी आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes