जुनी पेन्शनसाठी साखळी उपोषण : शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन
schedule03 Mar 26 person by visibility 37 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एक नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त विनाअनुदानित, अंशतः अनुदानित व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना १९८२ ची जुनी पेन्शन मिळावी यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय कोल्हापूर या ठिकाणी आमरण साखळी उपोषण आंदोलन सुरू आहे.
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोअर कमिटीचे कार्याध्यक्ष सुदेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत साखळी आमरण उपोषण सुरु आहे. दरम्यान पुणे शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी आंदोलन स्थळी भेट दिली. अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या आंदोलनास शिक्षक परिषदेचे उदय पाटील , मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगीरेकर , सुधाकर सावंत,सुधाकर निर्मळे , राजेंद्र कोरे, पतपेढीचे संचालक गजानन काटकर , प्रकाश पाटील, पतपेढीचे संचालक उमेश माळे व तज्ञ संचालक संदीप पाटील , शिक्षकेत्तर संघटनेचे संजय पाटील, मनोहर जाधव , मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे बाळासाहेब पाटील यांनी भेट दिली. तसेच कोल्हापूर जिल्हा सेवानिवृत्त बांधवांच्या मदतीने सुरू असणारे आंदोलनातील प्रमुख प्रकाश स्वामी, बाळासाहेब संकपाळ, श्रीधर चौगले, भीमराव संघमित्रा, सुशीला यादव तसेच कार्यरत शिक्षक बांधवा मधील अनिल इंगळे, उत्तम तिबिले, प्रभाकर धामणे, पांडुरंग चौगले, रवींद्र पाटील, बामनेकर सर,श्रीकांत पाटील, संजय देसाई, अमोल पाटील उपस्थित होते.