भाजपच्या युवा-ओबीसी-महिलासह अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकारी निवडी
schedule07 Oct 25 person by visibility 138 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर महानगर जिल्ह्याच्या वतीने नुकत्याच जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष आणि प्रमुख ५ मोर्चांच्या अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्या हस्ते युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओ.बी.सी. मोर्चा आणि अल्पसंख्यांक मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय जाधव व प्रदेश सचिव महेश जाधव यांनी, आगामी महापालिका निवडणुकांसाठी आजपासूनच सर्वांनी सज्ज होऊन आपल्या प्रभागात भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारासाठी जोमाने कार्यरत रहावे असे आवाहन सर्वान केले. याप्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष विश्वजित पवार, महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी नकाते, ओ.बी.सी. मोर्चा अध्यक्ष महेश यादव आणि अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष आजम जमादार यांच्यासह विराज चिखलीकर, धनश्री तोडकर, गणेश देसाई, गायत्री राऊत, राजसिंह शेळके, उमाताई इंगळे, रुपारानी निकम,डॉ राजवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती.