संस्कार विद्यालयात नशामुक्त - स्वस्थ भारत अभियानाचा जागर
schedule10 Aug 26 person by visibility 86 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नशामुक्त भारत अभियान, मिशन स्पंदन, भारत सरकार आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशामुक्त व स्वस्थ भारत’ अभियानांतर्गत जनजागृती कार्यक्रम संस्कार विद्यालय, शिये येथे उत्साहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करवीर सिटीझन फोरमचे अध्यक्ष शिवाजी नरके होते. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे प्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती होती.नरके यांनी नशेपासून दूर राहण्याचा संकल्प, व्यसनांचे दुष्परिणाम आणि निरोगी व आनंदी जीवनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. इयत्ता पहिली ते सातवीच्या सुमारे २९० विद्यार्थ्यांना नशामुक्तीची सामूहिक प्रतिज्ञा दिली. मुख्याध्यापक मच्छिंद्र नाळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास शिक्षक सुरेश पाटील, शिवाजी चौगले, राजेंद्र देशमुख, सायराबानू मोमीन, चैताली चौगले, संजीवनी भारती यांची उपस्थिती होती.