शिवसेनेकडून अजित नरके, अजित पाटील, एस.आर. पाटील, विरेंद्र मंडलीक, अशोक फराकटे, बाजीराव पाटलांचे अर्ज
schedule17 Sep 26 person by visibility 64 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेनेकडून गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. यामध्ये गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, माजी संचालक अजित नरके, एस. आर. पाटील, अजित पाटील, विरेंद्र मंडलिक, अशोक फराकटे , वडणगे येथील बाजीराव पाटील आदींनी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. शिवसेनेच्या उमेदवारांकडून अर्ज दाखल करताना आमदार चंद्रदीप नरके, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, जिल्हा परिषदेतील शिवसेनेचे गटनेते अरुण जाधव आदी उपस्थित होते.