परदेशातील विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी वारणा विद्यापीठात
schedule18 Sep 26 person by visibility 398 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वारणा विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (टीकेआयईटी), वारणानगर येथे २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी मोझांबिक देशातील विद्यार्थिनी शिलुवाह सेलिया लुसियानो उआंबा हिने संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. परदेशी नागरिक प्रवर्गातून झालेल्या या प्रवेशामुळे टीकेआयईटीच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी समुदायात भर पडली आहे. शिलुवाह हिचा प्रवेश १३ सप्टेंबर २०२६ रोजी निश्चित झाला आहे. टीकेआयईटीमध्ये परदेशी विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हा संस्थेच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. याबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. विनय कोरे, वारणा विद्यापीठाचे कुलाधिकारी एन. एच. पाटील, कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजिन्नी, प्राचार्य डॉ. के. आय. पाटील, अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे आणि अॅडमिशन इन्चार्ज डॉ. अमोल पाटील यांनी शिलुवाह हिचे अभिनंदन व स्वागत केले. याप्रसंगी संग्राम दळवी, उदय पाटील, पंडीत जाधव उपस्थित होते