Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधी

जाहिरात

 

667 दूध संस्था मतदानास पात्र, गोकुळच्या माजी चेअरमनासह संचालकांचा आनंदोत्सव

schedule03 Sep 26 person by visibility 943 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या घडामोडीत मंत्री हसन मुश्रीफ, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील  अरुण डोंगळे यांच्या दृष्टीने दिलासादायक निर्णय गुरुवारी मिळाला. उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने अवसायानातील ४९२  दूध संस्था व कार्यक्षेत्राबाहेरील ठरावधारक म्हणून तक्रार झालेल्या १७५ दूध संस्था अशा एकूण ६६७ दूध संस्थांच्या मतदानास पात्रतेचा निकाल दिला. हा निकाल समजतात गोकुळच्या माजी चेअरमन व संचालकाने आनंद व्यक्त केला. ते, गडहिंग्लज संपर्क दौऱ्यात होते.  गोकुळ दूध संघाच्या निवडणूक प्रचाराच्या गडहिंग्लज दौऱ्यावर असलेल्या सत्ताधारी संचालक मंडळातील माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील , माजी अध्यक्ष नविद मुश्रीफ, संचालक युवराज पाटील, अजित नरके, डॉ. सुजित मिणचेकर, नंदकुमार ढेंगे, बाळासाहेब खाडे, रणजितसिंह पाटील, किसन चौगले, अमरसिंह पाटील, एस. आर. पाटील, जिल्हा परिषदेचे  माजी उपाध्यक्ष सतीश पाटील -गिजवणेकर, राहुल शिरकोळी, विजय दाभाडे, शिवराज पाटील यांनी असा आनंद व्यक्त केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes