Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात काँग्रेस चालवतो शिवसेना ठाकरे पक्ष, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्ट्रक्चरल इंजिनियर्सतर्फे शनिवारी एकदिवसीय कार्यशाळा महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी राजेश लाटकर, काँग्रेसकडून निवडीसंबंधी महापौरांना पत्रकुंभोज येथील सरस्वती साधना केंद्र संस्कृती रक्षणासाठी महत्वपूर्ण : ललित गांधीसमृद्ध शाळा - समृद्ध प्राथमिक आरोग्य केंद्र राज्यासाठी आदर्शवत, जिल्हा नियोजन समितीत गौरवोद्गगारकोल्हापूर-मुंबई मार्गावर सकाळ – संध्याकाळच्या सत्रात विमानसेवा, दोन मार्चपासून प्रारंभमेन राजारामच्या विद्यार्थिनींनी जिंकली राज्यस्तरीय स्पर्धा ! पालकमंत्र्यांनी केले कौतुक, जिल्हा प्रशासनाने दिले बक्षीस!!शाहू मिलच्या डेव्हलपमेंटसंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक - पालकमंत्री प्रकाश अबिटकर सार्थक क्रिएशन्सच्या रौप्यमहोत्सवानिमित्त गुरुवारी विशेष कार्यक्रम, मान्यवरांचा सन्मान होणारअंगणवाडी कर्मचाऱ्यांची निदर्शने, अन्यथा  गुरुवारपासून कामबंद आंदोलन

जाहिरात

 

केआयटी कॉलेजमध्ये २६ गुणवंत विद्यार्थ्यांना मेरीट स्कॉलरशिप

schedule10 Feb 26 person by visibility 110 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :कोल्हापूर येथील नामांकित 'केआयटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या ' केआयटी मेरीट स्कॉलरशिप ' योजनेचा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाचा वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. यावर्षी एकूण २६ विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामगिरीबद्दल या स्कॉलरशिपद्वारे गौरविण्यात आले.

ही स्कॉलरशिप पूर्णपणे गुणवत्तेच्या आधारावर दिली जाते. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या एमएचटी सीईटी २०२५ मधील गुणांवर, तर वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मागील वर्षाच्या शैक्षणिक कामगिरीवर करण्यात आली आहे. यावर्षीच्या एकूण २६ लाभार्थ्यांमध्ये १३ मुले आणि १३ मुलींचा समावेश आहे. स्कॉलरशिप प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम वर्षातील शांभवी धर्म, दक्ष आवळे, मुग्धा पोतदार, साक्षी राऊत , श्रीतेज बोडगिरे , हर्षवर्धन भोसले , संस्कार चव्हाण, शिवराज पाटील , मृणाल कापसे , रिया पाटील, राधा भोसले, आदित्य केसरकर , वरद पाटील  आणि वेदिका पाटील यांचा समावेश आहे. द्वितीय वर्षातील श्रीनिवास कुलकर्णी ,माही चाटे, कृष्णा अडागळे , सोनिया एरांडे , सूर्यकांत शिंदे , आदित्य जाधव, सुयश पाटील, वैदेही राठोड, रितिका पाटील आणि अनिकेत गवळी यांना शिष्यवृत्ती मिळाली. तृतीय वर्षातील वेणू पाटील आणि आशिया तांबोळी हे शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले.

या सोहळ्यासाठी मुख्य अतिथी म्हणून संस्थेच्या माजी विद्यार्थिनी भारतीय नौदलातील अधिकारी सब लेफ्टनंट ईशा शहा, संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले, वरिष्ठ विश्वस्त श सुनील कुलकर्णी, संचालक डॉ.मोहन वनरोट्टी रजिस्ट्रार डॉ.दत्तात्रय साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. अधिष्ठाता ॲडमिशन डॉ. महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.अमर टिकोळे, संग्राम पाटील,सुरज पाटील  यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन केले.

……….

"केआयटी मॅनेजमेंट नेहमीच गुणवत्तेचा सन्मान करत आली आहे. या स्कॉलरशिपमुळे ग्रामीण व शहरी भागातील हुशार विद्यार्थ्यांना आर्थिक चिंता न करता उत्तम दर्जाचे इंजिनिअरिंग शिक्षण घेता येत आहे.२०२५-२६ च्या प्रवेश प्रक्रियेतही गुणवंत विद्यार्थ्यांचा कल ' केआयटी 'कडे या योजनेमुळे वाढला आहे.” पुढील शैक्षणिक वर्षातही ही योजना कार्यरत राहणार असून गुणवान विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण व शैक्षणिक शुल्कातील १०० टक्के सवलत या दोन्हीचा लाभ घ्यावा.”

  • साजिद हुदली, संस्था अध्यक्ष

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes