Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळमध्ये महायुतीचा दोन हजाराहून अधिक मतांनी विजय, ठरावधारकांनी सहलीवर जायची तयारी ठेवावी - हसन मुश्रीफश्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त गोकुळ शॉपीचे उद्घाटन‘टाइम टू मार्केट’ साधणाराच खरा उद्योजक, ग्रीन हायड्रोजनमध्ये मोठी संधी : कुलगुरू डॉ. राजनीश कामतराजू शेट्टी हे स्टंटबाज आंदोलक, सतेज पाटलांनी माझ्या मंत्रीपदाची काळजी करू नये - आमदार राजेश क्षीरसागरमहाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे धरणे आंदोलनजिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीरशक्तीपीठ महामार्गावरुन राजू शेट्टी -राजेश क्षीरसागर समर्थक भिडले रस्त्यावरविज्ञानाच्या जगाची विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती, शहीद पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची रिसर्च सेंटरला भेटशिक्षणाधिकारी मीना शेंडकरांच्याकडून सात प्रकरणात कर्तव्यात कसूर, पदस्थापनेत प्रशासकीय अनियमितता ! चौकशी अहवालात ठपका ! !शिक्षणाधिकारी मीना शेंडकरांना कारणे दाखवा नोटीस, खुलासा करण्यास सात दिवसाचा अवधी

जाहिरात

 

याद रख सिकंदर...महापालिका सभागृहात आदिल फरासांची माफी अन कव्वालीचे सादरीकरण

schedule03 Sep 26 person by visibility 1336 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन  प्रतिनिधी : महापालिकेत वृक्ष प्राधिकरण समितीच्या बैठकीत झालेल्या वादावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गट नेते व नगरसेवक आदिल फरास यांनी गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत माफी मागितली. 'माझ्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना त्रास सहन करावा त्या साऱ्यांची मी माफी मागतो ' अशा शब्दात त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.
महापौर रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त राजेंद्र भारूड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुवारी महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या सभेत '' महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर महापालिकेच्या मंजूर आकृती बंद व सेवा प्रवेश नियमाबाबत मंजुरी दिली आहे परंतु यामध्ये अनेक तृप्ती असल्याने त्यावर महासभेत सविस्तर चर्चा करून फेर मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव" होता तसेच कोल्हापूर महापालिकेत विविध विभागामध्ये गेली पाच ते पंधरा वर्षे काम करत असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेमध्ये समाविष्ट करण्याबाबत चा विषय ही सभेसमोर होता. या विषयावरील चर्चेत सहभागी होताना नगरसेवक फरास यांनी काही सूचना केल्या. त्याचवेळी त्यांनी काही दिवसापूर्वी आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जो वाद निर्माण झाला होता त्यावरून दिलगिरी व्यक्त केली. वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये घडलेल्या वादावरून काही जणांना जो त्रास झाला. मतदार अस्वस्थ झाले यामुळे मी साऱ्यांची माफी मागतो. मी कधीही जनतेच्या सेवेत कमी पडणार नाही, कामात कुचराई करणार नाही. माझे आजोबा, आई वडील यांनीही लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात काम केले आहे. त्यांचाच वारसा मी पुढे चालवत आहे. लोकांची सेवा करण्यात आम्ही कधीही मागे नाही. लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. मात्र वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये जो वाद झाला त्यावरून मी चुकीचा  मेसेज लोकांच्या पर्यंत जाऊ नये म्हणून मी या विषयावर बोलत आहे. माझ्या वागणुकीमुळे अथवा वादामुळे जे जे दुखावले त्या साऱ्यांचे मी माफी मागतो.'
फरास यांनी यावेळी कव्वालीतील दोन पंक्तिही सभागृहात ऐकवल्या. '' याद रख सिकंदर के होसले आली थे,  जब या दुनिया से दोनो हाथ खाली थे " या ओळी फरास यांनी ऐकवल्या. फरास यांच्या मनोगतनंतर महापौर रूपाराणी निकम यांनी ' साऱ्या सदस्याने शहरवासीयासाठी एकत्रित काम करायचे आहे. नगरसेवक फरास व नगरसेवक देशमुख यांचे एकमेकावर प्रेम आहे. कोणी कोणाचे दुश्मन नाहीत.'

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes