Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिप सदस्य अरुण जाधव यांच्या विरोधात जिल्हा कोर्टात याचिकाबुधवारपासून चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धा, यंदाची सर्वाधिक बक्षिसाची मोठी स्पर्धा कोरे अभियांत्रिकीच्या एनसीसी विभागाकडून रांगणा किल्ले पदभ्रमंतीडीवाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दहा पुरस्कारकरवीर गर्जनातर्फे गुढीपाडव्यादिवशी शोभायात्राकाँग्रेसने थाटली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल, गॅस दरवाढ –तुटवडावरोधात आंदोलनकोल्हापूर भाजपतर्फे राहुल गांधीच्या निषेधार्थ शिवाजी चौकात निदर्शने  किडनीच्या आरोग्यासाठी समतोल आहार-नियमित व्यायामाची गरज - डॉ विश्वनाथ मगदूम  महायुतीचा सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित, अध्यक्ष-उपाध्यक्षपद सव्वा वर्षासाठी !  पाच वर्षात ४ अध्यक्ष-उपाध्यक्ष, २० सभापती ! !गोकुळच्या कार्यक्रमात सतेज पाटलांची राजकीय टोलेबाजी, मुश्रीफ-नरकेंच्या उपस्थितीत महाडिकांना डिवचले ! आबिटकर, कोरे कार्यक्रमाला अनुपस्थित ! !

जाहिरात

 

करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शन व्यवस्थेत बदल

schedule13 Mar 26 person by visibility 75 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  करवीर निवासिनी श्री अंबाबाई  मंदिर येथे १४ ते १७ मार्च  2026 या कालावधीत पुरातत्व विभागामार्फत मंदिरातील श्री महाकाली, श्री अंबाबाई व श्री महासरस्वती या तिन्ही गर्भगृहांचे अंतर्गत व बाहय भागांचे जतन व संवर्धनाचे काम करण्यात येणार आहे. या कामाच्या अनुषंगाने या कालावधीत संबंधित गर्भगृहांमध्ये नेहमीप्रमाणे दर्शन व्यवस्था उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे या कालावधीत भाविकांसाठी श्रीच्या प्राणप्रतिष्ठापीत मंगल श्रीकलश तसेच श्रींच्या उत्सवमूर्तीचे दर्शन मुक्ती मंडप (पितळी उंबरा) येथून करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दरम्यानच्या काळात भक्तांना पितळी उंबरठा व श्री गणपती मंडप येथून दर्शन घेता येईल.१७ मार्च रोजी आवश्यक ते सर्व आगमोक्त्त व वेदोक्त धार्मिक विधी तसेच पूर्णाहुती संपत्र झाल्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या आरतीपासून श्री जगदंबेचे दर्शन पूर्ववत सुरू करण्यात येईल. भक्तांनी मंदिर प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे  सचिव शिवराज नाईकवडे यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes