Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

स्ट्राँग रुमसमोरील खाजगी सीसीटीव्ही काढण्याचा प्रशासनाचा काय अधिकार? सतेज पाटीलांची अधिवेशनात विचारणा

schedule10 Dec 25 person by visibility 220 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगरपालिकेच्या मतदानासाठी वापरलेली मतदान यंत्रे मराठा सांस्कृतिक भवनात ठेवण्यात आली आहेत. या स्ट्राँग रूमवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते मात्र प्रशासनाने व पोलिस विभागाने हे कॅमेरे काढून टाकली आहेत. तसेच स्ट्राँगरूमच्या अगदी समोर 'मोरे' नावाच्या व्यक्तीचे घर आहे. त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी घराला सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते. येथील मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तात ते खाजगी सीसीटीव्ही काढून टाकले. एखाद्या नागरिकाने स्वतःच्या घराच्या सुरक्षेसाठी लावलेले कॅमेरे काढण्याचा अधिकार प्रशासनाला कसा काय असू शकतो? अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी अधिवेशनात केली. पाटील यांनी ‘ सीसीटीव्ही काढण्याच्या प्रकारामुळे ईव्हीएम प्रक्रियेवर संशय निर्माण होण्यास वाव मिळतो. प्रशासनाची ही बेबंदशाही चालू असून, याची चौकशी करावी आणि हे काढलेले सीसीटीव्ही तातडीने पुन्हा बसवण्याचे आदेश सरकारने द्यावेत’ असा सुचना केल्या. याला उत्तर देताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes