Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!

schedule02 Feb 26 person by visibility 468 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाची निवडणूक लढविण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे. अजिंक्यतारा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या नेते मंडळी व नगरसेवकांची बैठक झाली. आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, नगरसेवक राजू लाटकर, प्रदेश पदाधिकारी सूर्यकांत पाटील बुद्धीहाळकर,  शिवसेनेचे सुनील मोदी आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या या बैठकीत महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारांची घोषणाही करण्यात आली. महापौर पदासाठी काँग्रेसचे नगरसेवक सचिन शेंडे तर उपमहापौरपदासाठी काँग्रेसचे नगरसेवक दुर्वास कदम यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. हे दोघेही दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे 34 नगरसेवक तर शिवसेना ठाकरे पक्षाच्या एक नगरसेवक निवडून आला आहे. महाविकास आघाडी म्हणून महापालिकेत एकूण 35 इतके संख्याबळ आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes