Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

schedule02 Feb 26 person by visibility 537 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महापालिकेने विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणारा निर्णय घेतला आहे. प्राथमिक शिक्षण समितीमार्फत राबवल्या जाणाऱ्या 'राजर्षी छत्रपती शाहू शिष्यवृत्ती' योजनेच्या रकमेत घसघशीत वाढ करण्यात आली असून, आता ही शिष्यवृत्ती २४०० ऐवजी महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्ती इतकीच म्हणजेच ५,००० रुपये करण्यात आली आहे. अशा प्रकारे शासकीय शिष्यवृत्तीच्या एवढी स्वतःची स्वतंत्र शिष्यवृत्ती देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महानगरपालिका ठरली आहे.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी व्हावी यासाठी महापालिकेतर्फे दोन सराव चाचण्या आणि एक अंतिम सराव परीक्षा घेतली जाते. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील पहिल्या २५ विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. विशेष म्हणजे, राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या तीन वर्षांपासून 'इस्रो'  या जागतिक दर्जाच्या संस्थेचा अभ्यास दौरा चक्क विमानाने घडवून आणला जात असून, या प्रवासाचा सर्व खर्च महानगरपालिका स्वतः उचलत आहे.
केवळ पाचवीच नव्हे, तर इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी 'कोल्हापूर टॅलेंट सर्च'  इयत्ता तिसरी व सहावीसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आणि चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ' स्कॉलरशिप परीक्षा' आयोजित करून महापालिकेने शिक्षणाचा एक आदर्श पॅटर्न उभा केला आहे. 
विशेष म्हणजे मनपा शाळेत शिकणारे इयत्ता पहिली ते सातवी मधील सर्वच विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेला सामोरे जातात. सर्वच विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेणारी कोल्हापूर महानगरपालिका ही महाराष्ट्रातील एकमेव महापालिका आहे.
आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रेरणेने आणि उपायुक्त  किरणकुमार धनवाडे तसेच प्रशासन अधिकारी  डी. सी. कुंभार, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रसूल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शैक्षणिक प्रकल्प यशस्वीपणे राबवले जात आहेत. तत्कालीन उपायुक्त साधना पाटील यांच्या संकल्पनेतून या संपूर्ण प्रक्रियेत शैक्षणिक पर्यवेक्षक  बाळासाहेब कांबळे,  विजय माळी आणि चंद्रकांत कुंभार यांचे विशेष योगदान लाभत आहे. तसेच परीक्षा विभाग प्रमुख  संजय शिंदे व प्राथमिक शिक्षण समितीकडील सर्व कार्यालयीन कर्मचारी या उपक्रमासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

" विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देऊन या योजनेकडे विशेष लक्ष दिले आहे " असे महापालिकेच्या आयुक्त के मंजूलक्ष्मी यांनी म्हटले आहे. या शिष्यवृत्ती संदर्भात बोलताना शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी डी. सी  कुंभार म्हणाले, "  पहिली ली ते ४थी चा कस या परीक्षेला लागतो .महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीची ५००० इतकी रक्कम  शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे ."

........
"महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या सर्वसामान्य विद्यार्थ्यांना  ही मोठी संधी निर्माण करून दिली आहे ."

किरणकुमार धनवाडे उपायुक्त

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes