Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका अधिकाऱ्यांची कमाल, टाकावूतून टिकाऊ !  भंगारातील आरसी वाहनांचे ट्रकमध्ये रुपांतर ! !शिवकाळातील इतिहासाला वंदन करत सह्याद्री प्रतिष्ठानची पदभ्रमंती मोहीम, वाड्यावस्त्यावरील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपकोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा

जाहिरात

 

जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाशदिप योजना- सभापती शीतल यादव 

schedule21 Jul 26 person by visibility 365 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उजेड, सुरक्षित आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण उपलब्ध व्हावे तसेच त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ व्हावी, या उद्देशाने शिक्षण समिती सभापती शीतल प्रविण यादव यांनी “विनय प्रकाशदिप योजना” राबविण्याची घोषणा केली.
   सभापती शीतल प्रविण यादव यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित करण्यात आली.बैठकीदरम्यान जिल्ह्यातील काही जिल्हा परिषद शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये पुरेशा प्रकाश व्यवस्थेचा अभाव असल्याची बाब निदर्शनास आली. योजनेअंतर्गत जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्गखोल्यांमध्ये शंभर टक्के विद्युत प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी नवीन लाईटची आवश्यकता आहे तेथे नवीन लाईट बसविणे, बंद अथवा खराब झालेल्या लाईटची तातडीने दुरुस्ती करणे तसेच विद्युत सुविधेची नियमित देखभाल करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.
याचबरोबर जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींच्या बांधकाम व दुरुस्तीच्या कामांची नियमित पाहणी करून गुणवत्तापूर्ण कामे पूर्ण करण्याची सूचना केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी धोकादायक इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीने पर्यायी व्यवस्था करावी, असे स्पष्ट आदेश सभापती यादव यांनी दिले.
शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी प्रत्येक तालुक्यात सेमी-इंग्रजी शाळांचा विस्तार करण्यावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षांसाठी विशेष नियोजन, विद्यार्थ्यांची प्रभावी तयारी आणि ‘मिशन अंकुर’ उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करून जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन सभापती  यादव यांनी केले.या बैठकीस शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, रेखा मुगडे, भगवान पाटील, स्नेहल वेल्हाळ, शुभांगी कुंभार, शिक्षणाधिकारी मीना शेंडकर उपस्थित होते.
*

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes