Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी मंत्रालयात सामंजस्य करार, ३५ हजार प्रेक्षक क्षमतेचे स्टेडियम होणारजिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विनय प्रकाश योजना- सभापती शीतल यादव  इंडिया आघाडीतर्फे शिवाजी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शने, निवेदन स्वीकारण्यास प्रशासनाचा नकारथायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! !

जाहिरात

 

थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्य

schedule21 Jul 26 person by visibility 401 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय व्यापार व व्यावसायिक नेटवर्किंगचे काम करणाऱ्या कोल्हापुरातील ग्लोबल व्हिजन ट्रेड ऑर्गनायझेशनमार्फत थायलंडमधील बँकाक येथे नुकतेच ‘इंडिया थायलंड ग्लोबल व्हिजन कॉन्कलेव्ह २०२६’चे आयोजन केले होते. कोल्हापूरसाठी खास गोष्ट म्हणजे, थायलंडसह इतर उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांनी स्थानिक कोल्हापूरच्या एमआयडीसी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी स्वारस्य दाखविले आहे. याकरिता परदेशी कंपन्याशी सहाय करण्यास इच्छुक शिवपती फार्मर प्रोड्युसर कंपनी, रासेश इंडस्ट्रीज एलएलपी आणि वेबरोलर कंपन्यांनी या परिषदेत सहभाग घेतला आहे अशी माहिती ग्लोबल व्हिजनचे अक्षय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. भारत थायलंड यांच्यातील आर्थिक संबंध दृढ करणारा हा उपक्रम ठरला आहे. भारतीय उद्योगांसाठी हे नवे दालन ठरत आहे. असेही ते म्हणाले. या परिषेदला थायलंडचे माजी उपपंतप्रधान कॉर्न दब्बारांसी, इंटरनॅशनल ट्रेड कोर्टचे  न्यायमूर्ती लुई लामा, थाई इंडिया बिझनेस अलायन्सचे  संस्थापक अध्यक्ष आजाण पॉल नरुला, ग्रुप पोर्टफोलिओचे संचालक फ्रेजर हॉकस पीपल्स रिफ्लेक्शनचे संचालक श्रीकांत घरात आदींची प्रमुख उपस्थिती होती. या परिषदेत आंतरराष्ट्रीय व्यापार, उद्योजक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल २५ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. पत्रकार परिषदेला भाग्यश्री कुंबोजे उपस्थित होत्या.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes