Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

जाहिरात

 

इंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

schedule02 Oct 26 person by visibility 84 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : इंडियन प्लंबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे (कोल्हापूर ,सांगली, सातारा , रत्नागिरी , सिंधुदुर्ग ) तीन, दहा व १७ ऑक्टोबर २०२६ रोजी कोल्हापुरातील रोटरी समाज केंद्र येथे ट्रेनिंग देण्यात येणार आहे. यामध्ये थेरॉटिकल प्रेझेंटेशन, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन,  प्रायोजक कंपन्यांकडून तांत्रिक माहिती या गोष्टींचा समावेश असेल. तर २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या ट्रेनिंग आणि परीक्षेमध्ये सहभागी झालेल्यांना सहभाग प्रमाणपत्र ही दिले जाणार आहे.  तसेच यातील गुणवत्ता मिळवलेल्या उमेदवारांना चेन्नई येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठीही पाठवले जाणार आहे . प्लंबिंग हे क्षेत्र तसे नवीन नाही पण यामध्येही रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी मधु किरण न्यू महाद्वार  रोड येथे संपर्क साधावा. यासाठी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  गुरमित सिंग अरोरा ,सचिव  मनिष जैन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या प्रशिक्षणाचे संयोजन कोल्हापूर चॅप्टरचे रवि साळुंखे, किरण जोशी, देवांग शेठ ,गिरीश कुलकर्णी, सुशांत नांगरे ,शीतल पाटील यांनी केले आहे. इच्छुकांनी संघटनेशी संपर्क करावा.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes