Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण यतसंत तुकारामांचे अभंग हे केवळ भक्तीपर नसून समाजप्रबोधनाचे प्रभावी साधन – डॉ. जी. पी. माळीशाहू मिलच्या जागेत राजर्षी शाहूंचे स्मारक, कापड पर्यटन केंद्रही उभारणारमुश्रीफ –कोरेंच्यामध्ये ऑल इज नॉट वेल…एकेकाळच्या मित्रांत वाढतेय राजकीय अंतर !जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टातसरकारी शाळा बंद करण्याच्या धोरणाविरोधात कोर्टात आव्हान, दोन एप्रिलला सुनावणीदुधाळ जनावरांसाठी पॅरामेट्रिक विमा योजना -  चेअरमन नविद मुश्रीफशिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, अर्थसंकल्पानंतर व्यापक बैठक श्रीशैल देवस्थानात सोळा ते वीस मार्च दरम्यान उगादी महोत्सव जिल्ह्यात सोळा मार्चपासून विशेष हेल्मेट तपासणी मोहीम, नो हेल्मेट - नो एट्री

जाहिरात

 

जिल्ह्यातील नेत्यांमध्ये एकमत होईना, जिप अध्यक्षपदाचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

schedule05 Mar 26 person by visibility 113 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा अध्यक्ष कोणाचा ? भारतीय जनता पक्षाचा की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा ? यासंबंधी निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक झाली. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री  हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे या साऱ्या नेतेमंडळीत चर्चा झाली. मंत्री पाटील यांच्या पुढाकारातून बुधवारी,( चार मार्च २०२६) मुंबई येथील हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. पण पहिल्यांदा अध्यक्ष आमचाच यावर भाजप व राष्ट्रवादीचे नेते अडून बसल्यामुळे निर्णयाविना ही बैठक संपली. अखेर अध्यक्षपदाबाबतचा निर्णय हा मुख्यमंत्री देवेंद्र शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री जो निर्णय देतील तो मान्य करण्याचे ठरले.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, समिती सभापती, महापालिकेतील समिती सभापती आणि गोकुळ निवडणूक अशा विविध विषयावर चर्चेसाठी आयोजित या बैठकीला महायुतीचे जिल्ह्यातील खासदार, आमदार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीला आमदार  राजेश क्षीरसागर, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, शिवाजी पाटील,  आमदार अमल महाडिक, राहुल आवाडे, अशोकराव माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार  प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषदेचे माज अध्यक्ष शौमिका महाडिक, राहुल पाटील, नगरसेवक प्रा. जंयत पाटील, जनसुराज्यचे समीत कदम, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष कृष्णराज महाडिक,  गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास आदी होते. या बैठकीत गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढविण्याचे ठरले.

बैठकीत जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापना व पद वाटपाचा फॉर्म्युला या अनुषंगाने चर्चा झाली. ज्या पक्षाकडे अध्यक्षपद त्यांच्याकडे समिती सभापतीपद नाही असे ठरले. शिवाय ज्या पक्षाकडे उपाध्यक्षपद, त्यांना आणखी एक समिती सभापती देण्याचा निर्णय झाला. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सव्वा वर्षासाठी हे सूत्र ठरले. दरम्यान या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्वाधिक २० जागा जिंकल्या आहेत, यामुळे अध्यक्षपद राष्ट्रवादीला मिळावे असा आग्रह धरला. तर मंत्री पाटील आणि खासदार महाडिक यांनी, भाजप, शिवसेना व जनसुराज्यचे संख्याबळ मांडत अध्यक्षपदावर दावा केला. भाजप  व राष्ट्रवादीने अध्यक्षपदावर दावा कायम ठेवल्यामुळे बैठक निर्णयाविना पार पडली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes