Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठारकेआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंद

जाहिरात

 

सिद्धार्थनगर परिसरातील परिस्थिती निवळली, दोन्ही गटातील ४०० जणांवर गुन्हा दाखल

schedule24 Aug 25 person by visibility 203 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सिद्धार्थनगर कमानीजवळ भारत तरुण मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी (२२ ऑगस्ट २०२५) फलक लावणे आणि साऊंड सिस्टिमच्या वादातून झालेल्या दगडफेक, वाहनांची तोडफोड, वाहन जाळणे यावरुन तब्बल ४०० जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. लक्ष्मीपुरी पोलिसांनी या दंगली प्रकरणी दोन्ही गटावर गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या ४०० जणांपैकी ३१ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही गटातील प्रमुख मंडळींची  पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. दोन्ही गटांनी समजुतीची भूमिका घेतल्याने शनिवारी या भागाातील तणाव निवळला.

पोलिस हवालदार मारुती कळंत्रे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेबागस्वार परिसरातील आसिफ शेख, शहारुख शेख, कौशिक राजू पटवेगार, सोहेल पटवेगार, तन्वीर मुजावर, नौशाद मुजावर, शाहरुख रिक्षावाला, तौसिफ शेख, अब्दुल रौफ सिद्धिकी,  अशपाक गॅसवाला, जरीब इनामदार, आश्रफ सिद्धिकी, इजाज शेख, साहिल हकीम, फरहाज नायकवडी, इकबाल सरकवास, बिलाल शेख, मुन्ना सिद्दीकी यांच्यासह जवळपास २०० जणांवर गुन्हा दाखल आहे. तर सिद्धार्थनगर परिसरातील सूरज कांबळे, अभिजीत कांबळे, शुभम कांबळे, विजय पटकारे, महेश कांबळे, लखन कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह जवळपास २०० जणांवर गुन्हा दाखल झाला. दोन्ही गटात शुक्रवारी वादावादी होऊन त्याचे पर्यवासन दगडफेक, जाळफोळीत झाले. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत वाद धुमसत होता. जमावाला शांत करण्यासाठी पोलिसांना लाठीमारही करावा लागला. परिस्थितीवर नियंत्रण मिळवताना काही पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. शुक्रवारी दिवसभर हा वाद धुमसत होता. रात्री वाद वाढत जाऊन दंगलसदृश्य टोक गाठले. दोन्ही गट आमनेसामने आले. जोरदार राडा झाला. वाहने पेटविण्यात आली. प्रारंभी पोलिस कुमक अपुरा होता. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिस फौजफाटा वाढविला. शनिवारी तणाव निवळल्यासारखे चित्र होते. दरम्यान या भागातील सगळी दुकाने बंद होती.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes