Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

जिल्हा परिषद - पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर

schedule29 Jan 26 person by visibility 238 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस लांबणीवर पडल्या. पाच फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान होणार होते. आता नव्या वेळापत्रकानुसार सात फेब्रुवारी रोजी मतदान आणि नऊ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात मृत्यू झाला. राज्य सरकारने राज्यात तीन दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे.यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन दिवस पुढे ढकलल्या आहेत. निवडणूक आयोगाने यापूर्वी पाच फेब्रुवारीला मतदान आणि सात फेब्रुवारीला मतमोजणी असा कार्यक्रम जाहीर केला होता. आता सात फेब्रुवारी रोजी मतदान होईल आणि नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होईल. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश कांकाणी यांनी सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सात फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान होईल. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes