Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

दि न्यू एज्युकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

schedule01 Feb 26 person by visibility 48 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : येथील शतकोत्तर परंपरा लाभलेल्या दि न्यु एज्यूकेशन सोसायटीचा १०५ वा वर्धापन दिन सोहळा संस्थेच्या पेटाळा क्रीडांगणावर उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्व‌जारोहण करण्यात आले. संस्थेच्या सर्व शाळांच्या एनसीसी, आरएसपी, गर्ल गाईड व प्रत्येक शाळेच्या टूप तर्फे संचलनाद्वारे मानवंदना देण्यात आली.

कॉग्निझंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे उपाध्यक्ष मधुराज जाधव उद्योजिका सुस्मिता शिरीष सप्रे श्रीमती गिता रणजीत जाधव, दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे सल्लागार विनोदकुमार लोहिया यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.दि न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पद्माकर सप्रे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अनिल लोहिया, नियामक मंडळाचे अध्यक्ष निर्मल लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर सदस्य प्रशांत लोहिया, कुशल सामाणी, राजेश लोहिया, प्रदीप पोवार, आदित्य यादव, सुजाता लोहिया, हेमिनी चांदेलकर, श्रीमती अनेरी लोहिया, हेमलता जाधव, अजय सप्रे, रेणुका सप्रे व यांची प्रमुख उपस्थिती होती.

 प्रमुख पाहुणे  मधुराज जाधव यांनी बालपणीच्या व शालेय जीवनाच्या आठवणी विद्यार्थ्यांना सांगितल्या.  माझ्या यशाची खरी बीजे या संस्थेमध्ये रुजली. तसेच विद्यार्थ्यांनी आता नव्याने आलेल्या आर्टीफिशियल इंटीलिंजन्स (ए.आय.) चा वापर करुन बदलत्मा ज्ञानाची विद्यार्थ्यांनी माहिती घेवून प्रगती केली पाहिजे असे सांगितले. संस्थेच्या विविध शाळांतील प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर अशा २२ कर्मचाऱ्यांचा, तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.  गुणवंत विद्यार्थी, खेळाडूंना सन्मानित केले. सहसचिव प्राचार्य एस. एस. चव्हाण यांनी अहवाल वाचन केले. सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी आभार मानले. एनसीसी ऑफीसर रुपाली पाटील यांनी माहिती दिली. शिक्षक सागर बगाडे,  वर्षा देशपांडे, महेश सुर्यवंशी व दिपक कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम या गीताने झाली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes