शाळांना उन्हाळी सुट्टी दोन मेपासून
schedule31 Mar 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळा सुट्टी दोन मे 2026 पासून जाहीर झाली. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी या संदर्भातील माहिती दिली. राज्य मंडळाच्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या सुट्टीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी संपूर्ण राज्यभरात दोन मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली. वार्षिक परीक्षेचा निकाल एक मे रोजी जाहीर करण्याच्या सूचना आहेत. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाल्यानंतर वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. तर शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील शाळा 15 जून पासून सुरू होतील असे शिक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे