फेरीवाल्यांचा सोमवारी महापालिकेवर मोर्चा
schedule19 Jul 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत आहे. महापालिकेच्या धोरणाविरोधात फेरीवाले संघटनेतर्फे सोमवारी, २० जुलै २०२६ रोजी महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. महापालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करुन पदाधिकारी व अधिकाऱ्यांची वाहने अडविण्यात येतील असा इशारा सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार व कॉम्रेड दिलीप पवार यांनी दिला आहे. सोमवारच्या मोर्चात हजारो फेरीवाले सहभागी होणार आहेत. शहर सौंदर्यीकरणाचे कारण पुढे करत फेरीवाल्यांना त्रास दिला जात आहे.प्रशासनाच्या चुकीच्या कामकाजाला विरोध करण्यासाठी मोर्चा आयोजित केला आहे. यावेळी रघुनाथ कांबळे, समीर नदाफ, राजू जाधव, अशोक भंडारे, रियाज कागदी आदी उपस्थित होते.