Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! ! काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

जाहिरात

 

भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!

schedule19 Jul 26 person by visibility 406 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्र सेवा दलाला जीवनाचा श्वास आणि ध्यास मानणारेआयुष्यभर समाजवादी समाज निर्मितीसाठी समर्पित वृत्तीने कार्य करणारेसमतेच्या विचारांनी कार्यकर्ते घडविणारेप्रत्येकाच्या जीवनात सदविचाराचा सुगंध पसरविणारेसंबंध देशभर प्रवास करुन सेवा दलाची बांधणी करणारे… सेवा दलाची चळवळ व्यापक करणारे आणि आचार - विचारात तफावत नसणारे व्यक्तिमत्व म्हणजे साथी भरत कल्लाप्पा लाटकर तथा काका ! त्यांच्या जीवनातील अनेकविध पैलू उलगडताना कुणाची मने गहिवरली तर कुणाचे डोळे डबडबलेले....तब्बल अडीच तास चाललेल्या शोकसभेत लाटकर काकांच्या जीवनातील असंख्य आठवणीचा पट उलगला. त्यांच्या विचारकार्याला उजाळा देताना पुढील पिढीला प्रेरणा मिळत राहावी यासाठी कोल्हापुरात भरत लाटकर यांचे स्मारक साकारावे आणि त्यांच्या संबंध कार्यावर स्मृतिग्रंथ निर्मिती करावी अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.  त्याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी, ‘राष्ट्र सेवा दल बढाना है, परिवर्तन लाना है’असा निर्धारही केला.

राष्ट्र सेवा दल कोल्हापूर जिल्हा शाखा आणि इंडिया आघाडीच्यावतीने शोकसभेचे आयोजन केले होते. हॉटेल अयोध्या येथील वृदांवन हॉलमध्ये रविवारी, २९ जुलै २०२६ झालेल्या आदरांजलीच्या सभेला साथीच्या आठवणींच्या सभेचे स्वरुप लाभले. राष्ट्र सेवा दलाच्या माजी महामंत्री झेलम परांजपे शोकसभेच्या अध्यक्षस्थानी होत्या काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी भरत लाटकर म्हणजे पक्की वैचारिक बैठक आणि तरुणांना दिशा देणारे व्यक्तिमत्व होते. संबंध देशभर राष्ट्र सेवा दल पोहचिवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी अनेकांच्या आयुष्यात परिर्तन घडविले. जे करायचे ते प्रामाणिकपणाने या वृत्तीने त्यांनी आयुष्यभर राष्ट्र सेवा दलात काम केले. सेवा दलाचा वैचारिक पाया ढळू दिला नाही. त्यांच्या निधनाने प्रकाशमय दिवा विझला असे वाटत असले तरी अंधार पडणार नाही अशी लख्खं कामगिरी त्यांची आहे. विचारांचा वारसा जपण्याचा संकल्प हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल’अशा नमूद केले.

राष्ट्र सेवा दलाची शिबिरात ‘चलो बसाये नया नगर’हे गीत भरत लाटकर पहाडी आवाजात पहाडी आवाजात म्हणायचे. त्यांना श्रद्धाजंली वाहण्यासाठी आयोजित सभेची सुरुवात ही राष्ट्र सेवा दलाच्या पथकांनी याच् गीतांनी केली. यानंतर एस. एम. कांबळे यांनी, ‘ भरत लाटकर यांचे व्यक्तिमत्व उलगडताना एशराष्ट्र सेवा दल म्हणजे जीवनाचा श्वास आणि ध्यास या भावनेने काकांनी काम केले.. ते आस्तिक नव्हते. नास्तिक नव्हते. तर वास्तविक होते. तीस वर्षे आम्ही एकत्र काम केले.’हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.हाजी बाबसो नदाफ यांनी भरत लाटकर म्हणजे कार्यकर्त्यांचा आधारवड होते असे सांगितले. पुण्याचे संजय गायकवाड यांनी सेवा दल वाचविणे, वाढविणे हीच खरी त्यांना आदरांजली असल्याचे सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील यांनी, ‘भरत लाटकर हे आपल्या विचारांशी आयुष्यभर प्रामाणिक राहिले. कोल्हापुरात त्यांनी प्रगतशील विचार रुजविले असे सांगितले. माजी आमदार के. पी. मेगन्नावर, सेवा दलाचे माजी अध्यक्ष प्रकाश कांबळे, सुभाष वारे, माजी महापौर आर. के. पोवार, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, कॉम्रेड आनंद लांबोरे, उदय नारकर, सतीश कांबळे, रघुनाथ कांबळे, अभिजीत हेगशिटे, राजाभाऊ आवसक, कर्नल चंद्रशेखर रानडे, प्राचार्य टी. एस. पाटील, माजी नगरसेवक अशोक भंडारे,आंतरभारती शिक्षण मंडळाचे सचिव एम. एस. पाटोळे, भरत रसाळे, आपचे उत्तम पाटील यांनी मनोगतामध्ये सध्याच्या स्थितीत सेवा दल वाढविणे, समतेच्या विचारांची समाजनिर्मिती करणे हीच खरी भरत लाटकर यांना श्रद्धाजंली ठरेल.’असे सांगितले. माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी, महाापलिकेने भरत लाटकर यांचे स्मारक साकारावे असे मत मांडले. मुख्याध्यापक विजय भोगम यांनी येत्या वर्षभरात विविध उपक्रमाद्वारे लाटकर काकांच्या स्मृती जागत्या ठेवल्या जातील. वक्तृत्व स्पर्धा, समूहगीत स्पर्धा, व्याख्यानमाला व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण असे कार्यक्रम संयोजकामार्फत आयोजित करणार असल्याचे सांगितले. याप्रसंगी शैलेश  लाटकर, राजेश लाटकर, कुमार लाटकर, माजी महापौर सूरमंजिरी लाटकर, रावसाहेब अलासे, अनिल होगाडे, कॉम्रेड दिलीप पवार, नामदेवराव कांबळे, शिवाजीराव परुळेकर, मारुती माने, शाहीर सदाशिव निकम, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक विनायक फाळके, प्रवीण सोनवणे, सुनील मोदी, माजी नगरसेवक दत्ता टिपगुडे, रमेश पुरेकर, महेश बराले, महेश उत्तुरे, सागर येवलुजे, सुयोग मगदूम, प्रा मधुकर पाटील, राजेंद्र बनसोडे, विजय टिपुगडे आदींची उपस्थिती होती.

……………………………………

“लाटकर काकांच्या आठवणींनी मन भरुन आलंय. त्यांनी सगळं आयुष्य विद्यार्थ्यांसाठी खर्ची घातले. प्रेमळ शिक्षक, शिस्तबद्ध मार्गदर्शक, विद्यार्थ्यावर प्रेम करणारा गुरु अशी त्यांची विविध रुपे डोळयासमोर उभे  राहतात. त्यांनी समाजमनावर चांगले संस्कार केले. हजारो विद्यार्थी घडविले. विचारकार्यातून समाजासमोर आदर्श उभा केला. संत तुकाराम महाराज यांनी म्हटल्याप्रमाणे ‘देह जरी जाई, किर्ती मागे उरी.’ तसे लाटकर काका सदैव स्मरणात राहतील.”

  • स्मिता मारुती माने, माजी नगरसेविका

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes