Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

श्रीकांत जाधव यांना रंगबहार जीवनगौरव पुरस्कार, अठरा जानेवारीला मैफल रंगसुरांची

schedule11 Jan 26 person by visibility 139 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : रंगबहार संस्थेच्यावतीने रविवार, (१८ जानेवारी २०२६) सकाळी ९ वाजता 'मैफल रंगसुरांची' हा कार्यक्रम टॉऊन हॉल येथे होणार आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, तसेच कला प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. रंगबहारच्या मैफिलीचे हे ४९ वे वर्ष आहे.
कलातपस्वी आबालाल रेहमान, कलामहर्षी बाबूराव पेंटर आणि विश्वरंग विश्वनाथ नागेशकर स्मृती सोहळ्यानिमित्त 'मैफल रंगसुरांची' १८ जानेवारी रोजी होत आहे. यामध्ये ज्येष्ठ चित्रकार श्रीकांत जाधव यांना तेरावा श्यामकांत जाधव रंगबहार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगावकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे.
 
 मैफलीत ओंकार पाटील हे  शास्त्रीय गायन सादर करतील. त्यांना मयुरेश मधुसूदन शिखरे (तबलावादक) यांची साथ लाभणार आहे, तर चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर (बेळगाव), अभिजित पोपट पाटील (सांगली), श्रुती रुग्गे (इचलकरंजी), प्रमोद देडगे (सावर्डे), अथर्व सावंत (कोल्हापूर), आदित्य सुतार (बेळगाव), श्रद्धा चराटकर (कोल्हापूर), किरण हणमशेट (बेळगाव), आशेर फिलीप (कोल्हापूर), दीक्षा देसाई (कोल्हापूर), सचिन बन्ने (मुंबई), तेजस पाटील (कोल्हापूर), स्वॉलिया इनामदार (इचलकरंजी) हे कला प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. शिल्पकार ओमकार मसूरकर (सावंतवाडी), प्रज्वल गोंधळी (सावर्डे), रोहन कुंभार (सांगली) हे शिल्प प्रात्यक्षिक सादर करतील. या उपक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष धनंजय जाधव, सचिव संजीव संकपाळ यांनी केले आहे.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes