Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

कोल्हापुरात धक्कादायक घटना, मुलाने केला आईचा खून

schedule15 Oct 25 person by visibility 861 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापुरातीर राजेंद्रनगर येथील साळोखे पार्क भारतनगर येथे मुलाने आईच्या डोक्यात वरंवटा घालून खून केला. बुधवारी (१५ ऑक्टोबर २०२५) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. दारुला पैसे देत नसल्याच्या रागातून हा खून करण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे. सावित्रीबाई अरुण निकम (वय ५३ वर्षे) असे मृत महिलेचे नाव आहे. तर पोलिसांनी, विजय अरुण निकम (वय३५ वर्षे) याला या गुन्हयाप्रकरणी अटक केली आहे. राजारामपुरी पोलिसांनी, विजयला घरातूनच अटक केली. सावित्रीबाई आणि मुलगा विजय हे दोघे भारतनगर येथे राहत होते.  विजय हा सेट्रिंगची व डिजीटल फलक लावण्याची काम करतो. त्याला दारुचे व्यसन आहे. त्याची पत्नी आणि दोन मुली विजापूर येथे माहेरी आहेत. विजयने बुधवारी सकाळी दारुच्या नशेत आईकडे पैसे मागितले. पैसे देण्यास आईने नकार दिला. पैसे दिले नाहीत या रागातून त्याने वरंवटा आईच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात सावित्रीबाई या जाग्यावरच ठार झाल्या. विजयने फोन करुन बहिणीला आईचा खून केल्याचे सांगितले. शेजाऱ्यानांही हा प्रकार कळला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes