Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला हिंदकेसरी, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळला उपविजेतेपदशिवसेना ठाकरे पक्षातर्फे मोदी सरकारच्या विरोधात विडंबनात्मक आंदोलनडीवाय पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजयबालिंगा पंपिंगवर अवलंबून असणाऱ्या भागांचा सोमवारी पाणीपुरवठा बंदप्राधिकरणला विशेष दर्जा, हद्दवाढ विरोधी कृती समितीतर्फे आमदार चंद्रदीप नरकेंचा सत्कारनेत्यांना हद्दवाढीविषयी देणेघेणे आहे की नाही ? पालकमंत्री, सहपालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : कृती समितीच्या बैठकीत तीव्र भावनासंजय शिंदेंच्या कोल्हापुरातील दीर्घकालीन पदस्थापनेची उच्चस्तरीय चौकशी करावी - प्रकाश बेलवाडेप्राधिकरणाच्या विशेष दर्जाचा हद्दवाढीवर परिणाम नाही, २०२७ च्या जनगणनेनंतर हद्दवाढ अटळच : राजेश क्षीरसागरइंधन बचत हीच राष्ट्रसेवा…शिक्षण समिती सभापती, शिक्षणाधिकाऱ्यांचा बसमधून प्रवास

जाहिरात

 

शिवसेना ठाकरे पक्षातर्फे मोदी सरकारच्या विरोधात विडंबनात्मक आंदोलन

schedule18 May 26 person by visibility 11 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वाढती महागाई, इंधनाचे चढे दर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परदेश दौरे या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाच्यावतीने कोल्हापुरात विडंबनात्मक आंदोलन करण्यात आले. ‘सोने-चांदी दुकानांना कुलूप लावा, पेट्रोल-डिझेल दर वाढले त्यांचे स्वागत करा’असे फलक हाती घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. बिंदू चौक येथे आंदोलन झाले.

  शिवसेना शहर प्रमुख मंजित माने यांच्या नियोजनातून आंदोलन झाले. ‘ कोल्हापुरातील नागरिकांनी काटकसर करण्यासाठी, लग्न, बारसे,स्वागत समारंभ, मुंज,जावळ,वास्तुशांती, इत्यादी कार्यक्रमावर खर्च करू नये.  पेट्रोल-डिझेलचे दर वाढले तरी कोणी यावर आंदोलन करू नये, उलट या दरवाढीचे आणि मोदींचे पुष्पहार घालून स्वागत करावे, याबरोबर सोन्या -चांदीच्या दुकानांना कायमचे कुलूप घालावे, कोल्हापूर जिल्ह्यात एक वर्षाकरिता जमावबंदी आदेश करावा, व या आदेशाचा भंग करून सोने खरेदी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, पेट्रोल पंपावर अर्धा लिटर पेट्रोलच्यावर पेट्रोल देऊ नये, व हे सगळे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध करावे,’ अशा उपहासात्मक, विडंबनात्मक  पद्धतीचे निवेदन शिवसेनेने प्रसिद्ध केले.

यावेळी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख माने, विराज पाटील,राजू यादव,अक्षय घाडगे अभिषेक दाभाडे अक्षय मोरे, सानिका दामूगडे, तृप्ती विभूते प्रिया माने, रमेश वरोटे सदाशिवराव पवार, महादेव सुतार, अभिषेक दाभाडे, जयवंत वडगावकर शुभम पाटील, ऋषिकेश जोशी, प्रथमेश देशिंगे, राजवर्धन झांबरे,गणेश भोसले आदींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes