Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कौस्तुभ गावडेंवर वाढदिवसानिमित्त  शुभेच्छांचा वर्षाव, मुख्यमंत्र्यांच्यासह मंत्री -खासदार -आमदारांकडून अभिष्टचिंतनशिक्षकांनी मराठीला स्वप्नांची भाषा बनवावी, स्वप्नांची भाषा ही भवितव्याची असते – डॉ. सुनीलकुमार लवटेवीजग्राहकांना अधिक दर्जेदार वीज पुरवठा द्या – अंकुर कावळेशिक्षक मतदारसंघ भाजपकडे ! कौस्तुभ गावडेंची उमेदवारी जाहीर !!डॉ. जयसिंगराव पवार यांनी पुराव्यासहित इतिहासाची पुनर्मांडणी  केली : प्राचार्य डॉ.डी. आर. मोरे गोकुळच्या जागा वाटपासाठी महायुतीच्या नेतेमंडळीवर दिल्लीला जाण्याची वेळ - आमदार सतेज पाटलांचा खोचक टोलाशिक्षक संघ पदवीधरच्या मैदानात ! एस. व्ही. पाटील निवडणूक लढविणार !!सेवानिवृत्तीनिमित्त महावीर सोळाकुंरे यांचा रविवारी गौरव समारंभकाँग्रेसची उमेदवारी जाहीर, पुणे शिक्षक मतदारसंघातून प्रा. जयंत आसगावकरइंडियन प्लबिंग असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरतर्फे प्रशिक्षण कार्यक्रम

जाहिरात

 

किकवी दूध प्रकल्प मालमत्ता खरेदी प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, शिवसेना ठाकरे पक्षाची मागणी

schedule02 Oct 26 person by visibility 93 categoryउद्योग

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाने पुणे जिल्ह्यातील मे अनंत दूध प्रायव्हेट लिमिटेड किकवीची मालमत्ता खरेदी करताना आर्थिक व प्रशासकीय अनिनिमिता झाली आहे. सहकार संस्थेने केलेल्या चौकशीतही किकवी खरेदी प्रकल्पात आर्थिक अनियमितता झाल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दरम्यान 82 कोटी सहा लाखाची ही मालमत्ता खरेदीसाठी तेरा कोटी र रुपयांच्या खर्चास संचालक मंडळांनी विशेष वित्तीय प्रशासकीय मान्यता दिली आहे. या मालमत्ता खरेदीमध्ये जवळपास 50 कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे या साऱ्या प्रकरणी संचालक मंडळ  दोषी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी तसेच या मालमत्ता खरेदी प्रक्रियेतील अनेक माजी संचालक सध्या गोकुळची निवडणूक लढवत आहेत त्यामुळे गोकुळची निवडणुक स्थगित करावी अशी मागणी शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली. ठाकरे पक्षाच्यावतीने या प्रकल्पामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप यापूर्वीही करण्यात आला होता. तसेच गोकुळ मधील विरोधी आघाडीच्या संचालिका शौमिका महाडिक यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे या प्रकल्पाच्या खरेदी प्रक्रियेबाबत तक्रार केली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या साऱ्या प्रकाराची दखल घेऊन तत्काळ चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी पवार यांनी केली. शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनीही गोकुळच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचा बाजार सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्यावी अशी मागणी केली. तर शिवसेना जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी किकवी प्रकल्प खरेदी प्रक्रियेची एसआयटी मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी केली. पत्रकार परिषदेला अवधूत साळोखे, नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे  शहरप्रमुख मंनजीत माने, महिला आघाडीच्या रिमा देशपांडे आदी उपस्थित होत्या

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes