Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

शिवसेनेच्या गटनेतेपदी शारंगधर देशमुख

schedule26 Jan 26 person by visibility 908 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक शारंगधर देशमुख यांची निवड करण्यात आली. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची बैठक झाली. शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. शिवालय येथे झालेल्या या बैठकीत देशमुख यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, सत्यजीत जाधव, वैभव माने, स्वरुप कदम, अजय इंगवले, अश्किन आजरेकर, अभिजीत खतकर,नगरसेविका अनुराधा खेडकर, अर्चना पागर, संगीता सावंत, मंगला साळोखे, प्राजक्ता जाधव, शिला सोनुले, कौसर बागवान आदी उपस्थित होते. गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल नगरसेवक देशमुख यांचा आमदार क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes