Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

समूहभाव -सहानुभाव हे खेडयांचे मूलतत्व, मात्र संवेदनाशून्य नव मध्यमवर्गाला हा गावगाडाच समजला नाही : राजन गवस

schedule30 Jan 26 person by visibility 141 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : ‘समूहभाव आणि सहानुभाव हे खेडयांचे मूलतत्व आहे. गाव एक समूह आहे आणि पशु-पक्षी जगली पाहिजेत, जंगली वाचली पाहिजेत. तरच जगण्याला अर्थ आहे. किडया मुंग्याना जेवढा जगण्याचा अधिकार तेवढाच मलाही अधिकार या सहानुभावावर खेडेगाव उभी आहेत. मात्र गेल्या काही वर्षात चंगळवादाकडे झुकलेला व संवेदनाशून्यू असा जो नवमध्यमवर्ग निर्माण झाला, त्यांनी समूहभाव आणि सहानुभावची जबाबदारी नीट पार पाडली नाही. या नवमध्यमवर्गाने ‘आतला-बाहेरचा’ गावगाडाच समजून घेतला नाही. यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण झाले’असे मत प्रसिद्ध साहित्ियक राजन गवस यांनी व्यक्त केले.

’लोकमतचे पत्रकार विश्वास शामराव पाटील लिखित ‘फेरा जन्म मृत्यूचा’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ आयोजित केला होता. साहित्यिक गवस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशित करण्यात आले. ज्येष्ठ संपादक वसंत भोसले हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. लोकमत कोल्हापूरचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख, कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे, प्रकाशक भाग्यश्री पाटील, महिला व बालविकास अधिकारी शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे शुक्रवारी सायंकाळी प्रकाशन वितरण समारंभ झाला.

याप्रसंगी बोलताना साहित्यिक गवस यांनी मुक्तचिंतन केले. सध्याची सामाजिक स्थिती, बदलते ग्रामजीवन, आत्मकेंद्रित नव मध्यमवर्ग यावर ऊहापोह करताना ते म्हणाले,‘ गाव हा एक समूह आहे. जे जे असेल ते गावचे, समूहाचे. या समूहभाव आणि सगळयासहित जगण्याचा सहानुभाव हा ग्रामजीवनाचा, खेडयांचा मूळ स्वभाव आणि मूलतत्व. मात्र आंग्ल संदर्भातील शिक्षणातून जो वर्ग तयार झाला. त्यांनी खेडी किती समजून घेतली ? त्यांना गावगाडा किती समजला.प्रत्येक गावगाडयामध्ये एक गाव आत असतो, एक गाव बाहेर असतो. आतला बाहेरचा हा गावगाडा समजून घ्यायला हवा होता. मात्र नव मध्यमवर्गाने साऱ्यांनाच अंतरावर ठेवले.त्यांना समूहभाव आणि सहानुभाव माहित नाही. त्यांनी किडया मुग्यांना बाहेर ठेवलं. भयंकर म्हणजे, त्यांना सोबत आई बापही चालत नाहीत. संवेदनाशून्य आणि चंगळवादी वृत्तीत वाढीस लागली. खेडयातील शिकलेल्या पोरांनीही आपली जबाबदारी पार पाडली नाही.’

संपादक वसंत भोसले यांनीही सध्याच्या बदलत्या स्थितीवर भाष्य करताना जे समाजहिताचं आहे, कसदार आहे. त्याच्या पाठीशी समाजाने उभं राहावे. पत्रकार विश्वास पाटील यांनी समाजहित केंद्रस्थानी ठेवून बंडखोरी वृत्तीने प्रबोधनात्मक लिखाण केले आहे. निश्चितच ते समाजाला उपयुक्त ठरणारे आहे.’असे नमूद केले. लेखक व पत्रकार पाटील यांनी, ‘ कर्मकांड, अंधश्रद्धा, खाेटी प्रतिष्ठा यामुळे समाज जीवनावर होणारा परिणाम हा अस्वस्थ करणारा आहे. समाज बदलायचा असेल तर सुरुवात स्वत: पासून करायला हवी. समाजात शिक्षित, नवं मध्यमवर्ग जो तयार झाला आहे तो कर्मकांड व अंधश्रद्धेत गुरफटत आहे. श्रद्धा जरुर असावी, पण अंधश्रद्धा व कर्मकांडाकडे झूकू नये.  समाजातील ढोंगीपणा, दांभिकतेवर शाब्दिक प्रहार करताना समाजातील चांगुलपणा, बदलाचे  वारे नेमकेपणाने टिपत ते समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.’ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes