Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

रुपाराणी निकम होणार कोल्हापूरच्या महापौर, आज दुपारी अर्ज भरणार ! मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

schedule02 Feb 26 person by visibility 554 categoryमहानगरपालिका

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी भारतीय जनता पक्षाच्या  नगरसेविका रुपाराणी संग्राम निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.  मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांचे नाव निश्चित केल्याचे जाहीर केले.  महापालिका निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महायुतीला  स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित झाले. रुपाराणी निकम यांच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचा पहिला महापौर होणार आहेत. 6 फेब्रुवारी रोजी महापौर निवड आहे.
पहिल्या वर्षी भारतीय जनता पक्षाचा महापौर व शिवसेनेचा उपमहापौर असणार आहे. शिवसेनेकडून जनसुराज्य शक्ती पक्षातून निवडून आलेले नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे वृत्त आहे. सोमवारी दोन फेब्रुवारी रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत महापौर व उपमहापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे 26,  शिवसेनेचे 15 नगरसेवक निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे चार नगरसेवक आहेत. जनसुराज्य शक्ती पक्षाचे एक नगरसेवक आहे महायुतीचे संख्याबळे 46 वर पोहोचले आहे
 नागाळा पार्क येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक,  आमदार अमल महाडिक, प्रा. जयंत पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, राहुल चिकोडे, भाजपचे गटनेते मुरलीधर जाधव यांच्या उपस्थितीमध्ये  भाजपच्या नगरसेवकांची बैठक झाली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर महापालिकेत भाजपचा महापौर होणार असल्याचे स्पष्ट केले. भाजपकडून नगरसेविका निकम  या उमेदवार असतील असे त्यांनी स्पष्ट केले. महापौरपदाची निवड किती वर्षासाठी आहे? या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, "राजकारणामध्ये स्थिर असे काही नसते. ज्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात." असे सांगत जादा बोलणे टाळले. भाजपकडे महापौर पदासाठी नगरसेवक विजय खाडे, प्रमोद देसाई, विशाल शिराळे, विजय देसाई आणि वैभव कुंभार अशी नावे चर्चात होती महापौर पद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes