Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोखले कॉलेजमध्ये वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विजेत्यांना बक्षीस प्रदानप्राचार्य डॉ. धनाजी कणसे, डॉ. आर. आर. कुंभार, प्रा. अरुण पाटील, प्रा. गजानन माळी यांना राज्य सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कारनगरसेवक हमरीतुमरीवर, प्रशासनाचा मोठा निर्णय ! महापालिकेची गुरुवारची सर्वसाधारण सभा होणार पोलिस बंदोबस्तात ! !ज्ञानपीठ विजेते लेखक वि.स. खांडेकर हे मानवी जीवनाचे भाष्यकार, त्यांच्या साहित्याची प्रासंगिकता काळाच्या पुढे - डाॅ. भालचंद्र मुणगेकरखाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर कोल्हापुरात मंत्र्यांच्या समर्थकांची अधिकाऱ्यांवर दमबाजी ! कार्यालय पेटवण्याची, बुटाने मारण्याची धमकी ! !डी वाय पाटील व्यवस्थापन विभाग विद्यार्थ्यांचा देशी वृक्ष प्रजातींच्या संवर्धनासाठी पुढाकारकार्यालयात नगरसेवकांची भांडणे, चौकात कार्यकर्ते आमनेसामने! महापालिकेचा बनतोय आखाडा, पदाधिकारी म्हणतात हा कौटुंबिक वाद !!आयुक्तांच्या कार्यालयातच शारंगधर देशमुख - आदिल फरास एकमेकांना भिडले !  चौकात कार्यकर्ते जमले, पोलिसांचा हस्तक्षेप- नेत्यांची फोनाफोनी!!शिक्षक मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मला मिळेल, रविवारी प्रचाराचा शुभारंभ करणार - मंगेश चिवटे

जाहिरात

 

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक  पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाइस चेअरमनपदी चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर 

schedule02 Sep 26 person by visibility 131 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी रोहिणी येडगे, व्हाईस चेअरमनपदी शिवाजी सोनाळकर यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ सभेत या निवडी पार पडल्या.सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी म्हणून महेश शेलार होते. संस्थापक भरत रसाळे यांच्या प्रमुख उपस्थितत या निवडी पार पडल्या.
 चेअरमनपदासाठी  येडगे यांचे नाव संचालक वर्षाराणी वायदंडे यांनी सुचविले त्यास संचालक कृष्णात चौगले यांनी अनुमोदन दिले. तर व्हाईस चेअरमनपदासाठी  सोनाळकर यांचे नाव संचालक सताप्पा कासार यांनी सुचविले तर अरुण गोते यांनी अनुमोदन दिले.
  संस्थापक भरत रसाळे म्हणाले की संस्था उत्तरोतर  प्रगतीपथावर आहे. असाच संस्थेचा चढता आलेख नूतन चेअरमन व्हाइस चेअरमन ठेवतील असा विश्वास व्यक्त केला. सुरवातीपासूनच संस्थेचा कारभार पारदर्शी व काटकसरीचा सुरू आहे. नूतन चेअरमन  येडगे म्हणाल्या की संस्थेचा कारभार संस्थेचे संस्थापक आदरणीय भरत रसाळे यांच्या मार्गदर्शनानुसारच होणार आहे मला दिलेल्या संधीचा मी संस्थेच्या उत्कर्षासाठीच प्रयत्न करणार आहे*
यावेळी व्हाईस चेअरमन  सोनाळकर, माजी चेअरमन साताप्पा कासार, संचालक मच्छिंद्र नाळे, वर्षाराणी वायदंडे,संतोष आयरे यांनी मनोगत व्यक्त केली. माजी व्हाईस चेअरमन अमित परीट यांनी आभार मानले.यावेळी संचालक  सर्जेराव नाईक, राजेश कोंडेकर, राजेंद्र कोरे, संदीप सातपुते,विनोद घुले, कार्यकारी संचालक - सदाशिव साळवी उपस्थित होते.
 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes