Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाचे आठ विद्यार्थी बनले सांख्यिकी अधिकारीमहापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याना केएमटीचा मोफत बस पास, ७५५ विद्यार्थ्यांना पासचे वितरणथोरला दवाखाना गोरगरिबांची आरोग्यदायिनी, केशवराव भोसले नाट्यगृह कोल्हापूर शहराची अस्मितामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !रसायनशास्त्र विभागातील प्राध्यापकांच्या संशोधनाला सरकारचे पेटंटपवित्र पोर्टलद्वारे राज्यातील ३० हजारांहून अधिक शिक्षक पदांची भरती प्रक्रिया सुरूविद्यापीठामध्ये राजकीय अड्डा करू नका ! शिवसेना युवासेना - मनसेचा अभाविपच्या कार्यक्रमावर आक्षेप ! !डी. वाय. पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी शनिवारी सर्वपक्षीय शोकसभातात्यासाहेब कोरे फार्मसी कॉलेजच्या बी फार्म अभ्यासक्रमास अ मानांकनहुतात्मा क्रांती सामाजिक संस्थेतर्फे आठ ऑगस्टला क्रांतिज्योत मिरवणूक

जाहिरात

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी आष्ट्यात ! अण्णासाहेब डांगे यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन, नूतन इमारतींचे उद्घाटन! !

schedule07 Aug 26 person by visibility 108 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : माजी मंत्री, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब डांगे यांच्या जीवनप्रवासातील ९१ व्या वर्षाचा प्रारंभ सोहळा रविवारी, (९ ऑगस्ट २०२६) आयोजित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णासाहेब डांगे यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘आम्रवृक्ष’ या आत्मचरित्राचा प्रकाशन, आष्टा शैक्षणिक संकुलातील नूतन इमारतींचा उद्घाटन सोहळा होणार आहे. मा. अण्ण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होत आहे.विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार गोरे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होणार आहे.यावेळी खासदार, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधी यांची उपस्थिती असणार आहे.संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. चिमण डांगे, सहसचिव विश्वनाथ डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

……………………………………………………………………………………………………….

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes