Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

न्यू कॉलेजमध्ये संख्याशास्त्र विभागामार्फत स्टॅटस्पार्क 2026 चे आयोजन

schedule30 Jan 26 person by visibility 108 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : : येथील न्यू कॉलेजमधील संख्याशास्त्र विभागातर्फे स्टॅटस्पार्क २०२६ हा शैक्षणिक उपक्रम बीएस्सी भाग एकच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आला. विविध महाविद्यालयांतील १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. या उपक्रमात पी.व्ही.पी. महाविद्यालय कवठेमहांकाळ, बलवंत कॉलेज विटा, पी.डी.व्ही.पी. महाविद्यालय तासगाव, एम एच महाविद्यालय तिसंगी, राजाराम कॉलेज कोल्हापूर, गोखले कॉलेज कोल्हापूर, आर.सी. शाहू कॉलेज कोल्हापूर आणि विवेकानंद कॉलेज कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांचा सहभाग होता. 
उद्घाटन कार्यक्रमासाठी  राष्ट्रीय सांख्यिकी विभाग मुंबई येथील विभागीय अधिकारी रुपाली कर्णे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील अध्यक्षस्थानी होते. कॉलेजचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. एन. व्ही. पवार आणि प्रबंधक श्रीमती. एम. वाय. कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. समन्वयक आणि  संख्याशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. डी. जी. गोडसे यांनी उपक्रमाचा आढावा घेतला. तेजश्री पाटील यांनी आभार मानले.

सरिता यादव, रूपाली कर्णे शुभम शिंदे यांनी संख्याशात्रातील संधीसंबंधी चर्चा केली. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे मूल्यमापन प्रा. लतीका शिंदे यांनी केले. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासह “सांख्यशास्त्रातील ध्रुवतारा” हे पुस्तक भेट दिले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे दिली. पुरस्कार वितरणाचे कार्य डॉ. ए. ए. कलगोंडा, डॉ. पवार आणि  विजय कोष्टी यांच्या हस्ते पार पडले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes