Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा

जाहिरात

 

खाबुगिरीची सेवा, सीपीआरमधील मॅडम, सरांच्या नावावर लाखोची आकडेमोड! वैद्यकीय बिल मंजुरीत डल्ला !!

schedule09 Dec 25 person by visibility 163 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : थोरा दवाखान, गरीबांचा दवाखाना म्हणून छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाची ओळख. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण येथे उपचारासाठी धाव घेतात. सरकारी हॉस्पिटल म्हणून मोफत उपचाराची सुविधा असलेले सीपीआर  म्हणजे सामान्यांसाठी आधारवड. सरकारकडून येथे विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे सीपीआर हे वैद्यकीय उपकरणांनी सुसज्ज बनावे, रुग्णांना दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत.मात्र दुसरीकडे सीपीआर म्हणजे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैसे खाण्याचे कुरण वाटत आहे. वैद्यकीय साहित्य खरेदी, औषध खरेदीतील भ्रष्टाचार ताजा असताना आता त्यामध्ये भर पडलीय ती, वैद्यकीय बिलांच्या मंजुरीत मारलेल्या डल्ल्याची. धक्कादायक प्रकार म्हणजे, वैद्यकीय बिल मंजुरीसाठी सीपीआरमधील वरिष्ठ अधिकारी असणाऱ्या मॅडम आणि सरांना दिलेल्या रकमेचा उल्लेख केलेली डायरी सापडली आहे.

शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार आठ डिसेंबर २०२५ रोजी समोर आला. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्येच केलेल्या या तपासणीत ही डायरी हाती लागली. या डायरीतून कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम दिली, कोणत्या सामाजिक संघटनेने वरकमाई केली व पक्षाच्या कार्यकर्त्यांची नावेही सापडल्याने सीपीआरमधील खाबुगिरीचा भांडाफोड झाला. सरकारी कर्मचाऱ्यांना आजारपणावरील उपचारासाठी वैद्यकीय खर्च दिला जातो. हे कर्मचारी ज्या सरकारी कार्यालयात काम करतात तेथील कार्यालयाकडून प्रस्ताव जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे पाठविला जातो. संबंधित रुग्णांवरील उपचार,सादर केलेल्या बिलाची शहानिशा होते. त्यानंतर संबंधित रुग्णांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार ही फाईल कोषागार कार्यालयाकडे जाते. जिल्हा शल्य चिकित्सकांचा अभिप्राय हा अंत्यत महत्वाचा ठरतो.

‘वैद्यकीय बिल मंजुरीसाठी टक्केवारी ठरलेली आहे. ज्याचे पाकिट वजनदार, त्यांची बिले झटपट मंजूर. हा येथील व्यवहार. रितसरपणे प्रस्ताव सादर झाला तर वर्षानुवर्षे फाइल धूळ खात पडून राहते. वैद्यकीय बिल मंजुरीसाठी सीपीआरमधील अधिकारी व कर्मचारी आर्थिक लूट करतात हा आरोपही काही नवीन नाही. मात्र शिवसेनेचे उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये वैद्यकीय बिलांसाठी घेतलेल्या पैशांची नोंदवही सापडल्याने खळबळ उडाली आहे. या डायरीत,  अधिकाऱ्यांना दिलेल्या  रकमेची तारीखनिहाय नोंद आहे. मॅडमना २८ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत सहा लाख ९१ हजार रुपये दिल्याची नोंद आहे. तर सरांना १४ ऑगस्ट २०२५ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पाच लाख रुपये दिल्याची नोंद आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने या साऱ्या प्रकारावरुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना जाब विचारला. जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून सीपीआर भ्रष्टाचारमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेचे उपनेते पवार यांनी केली आहे.

………………………..

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes