Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
थायलंडमधील कंपन्यांना कोल्हापुरात उद्योग क्षेत्रासाठी गुंतवणुकीस स्वारस्यकेशवराव भोसले नाट्यगृह व्यवस्थापनासाठी बाह्य संस्थेला देण्यासाठी महापालिकेला घाई ! वीस मिनिटाच्या चर्चेअंती ठराव मंजूर ! !बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !सरकारने दडपशाही करण्यापेक्षा आंदोलकांसोबत चर्चा करावी, शिक्षक संघटना समन्वय समितीची मागणी४१० दूध संस्थांच्या नोटिसावरुन शौमिका महाडिकांचा तत्कालिक संचालकांसह नेतमंडळीवरही निशाणा डॉ. मेघा पानसरे, डॉ. ऐश्वर्या रेवडकर, कुसुम अलाम, वर्षा ढोके  यांना पुरस्कारशिवसेना ठाकरे पक्षातर्फे  सोनम वांगचुकांच्या लढ्याला पाठिंबा ! सरकारच्या हुकूमशाही विरोधात जोरदार घोषणाबाजी ! ! काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्तेपदी संपत पाटील, अमोल माने भाव सेवेचा - काम राष्ट्रव्यापी ! साथी भरत लाटकरांच्या आठवणींनी डबडबले डोळे... गहिवरली मने !!वकिलांच्या सुरक्षेसाठी विधेयक,  बार असोसिएशनतर्फे आमदार राजेश क्षीरसागरांचे आभार

जाहिरात

 

कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंबंधी विद्यापीठ प्रशासनासोबत कास्ट्राइब संघटनेची बैठक

schedule19 Jul 26 person by visibility 83 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  : कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसंबंधी कास्ट्राईब संघटनेच्या प्रतिनिधींची, कुलगुरू डॉ. आर. के. कामत व प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्यासोबत बैठक झाली. कुलसचिव डॉ व्ही एन शिंदे, आस्थापनाचे उपकुलसचिव  डॉ सकट, विशेष कक्ष विभागाच्या उपकुलसचिव  संध्या अडसुळे मॅडम , डॉ निवास माने यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा झाली. कास्ट्राइब संघटनेचे अध्यक्ष आनंदराव खामकर यांनी विविध विषय मांडले. या बैठकीत विद्यापीठ फंडातील कार्यात कर्मचाऱ्यांना ५८ महिन्याचा फरक मिळावा,  प्रदीर्घ सेवेतून निवृत्त होणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशी  रजा रोखीकरण रक्कम मिळावी, कर्मचाऱ्यांना दुचाकी इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्यासाठी ॲडव्हान्स देणे. सामाजिक वंचितता समावेशन अभ्यास केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सेवापुस्तक ठेवणे व त्यांचे पीएफ /डीसीपीएस कपात करणे, हंगामी व करार पद्धतीने नियुक्त शिक्षकांच्या वेतनामध्ये वाढ करावी.  सारथी बार्टी  आणि महाज्योती संशोधक विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी संदर्भात समिती नेमणे, त्यांना फेलोशिप मिळण्यासाठी समन्वय साधून प्रशासनाने योग्य ते पावले उचलणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी  संघटनेचे उपाध्यक्ष उदय पोवार, दिनेश उथळे, डॉ. सुनिता वांगीकर, प्रशांत देवकर,  कमलाकर जाधव, प्रकाश श्रावस्ती, दीपक शिंदे, बाबुराव तिळणे आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes