Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

अमृता डोंगळे, संग्राम कलिकते, पुनम पाटील यांना विजयी करु या,  हसन मुश्रीफांची मतदारांना साद       

schedule27 Jan 26 person by visibility 155 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘भोगावती खोऱ्याच्या सर्वांगीण विकासामध्ये कै. दादासाहेब पाटील- कौलवकर, माजी आमदार गोविंदराव कलिकते आणि कै. गणपतराव डोंगळे या तिघांचेही योगदान मोठे आहे. या निवडणुकीत ही तिन्ही घरांणी एकत्र आली आहेत. कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघाच्या उमेदवार अमृता डोंगळे, कसबा तारळे पंचायत समिती मतदार संघाचे उमेदवार संग्राम अरूण कलिकते, कौलव पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार पुनम युवराज पाटील यांना विजयी करू या. त्यांच्या विजयाने कै. दादासाहेब पाटील-कौलवकर, माजी आमदार कै. गोविंदराव कलिकते,  कै. गणपतराव डोंगळे यांच्या कार्याचा गौरव  होऊ दे, ’अशी साद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मतदारांना घातली.         
कसबा तारळे जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचारार्थ घोटवडे येथे जाहीर सभा आयोजित केली होती. या सभेत माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, या निवडणुकीत अरुणराव डोंगळे यांच्या सहकार्याने या विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पुढे नेऊ. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते या नात्याने राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच उमेदवारांच्या विजयासाठी त्यांचे योगदान लाभणार आहे. आम्ही सर्वजण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली काम करू.
मुश्रीफ म्हणाले, अरुणराव डोंगळे गेली अनेक वर्षे गोकुळ दूध संघाच्या संचालक पदाच्या माध्यमातून सहकारात सेवार्थ आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने दुर्दैवाने त्यांच्या
  घरातच धर्मयुद्ध सुरू झाले आहे. शेवटी जे महाभारतात झाले तेच होणार आहे. धर्म विरुद्ध अधर्मची ही लढाई आहे. तुम्ही सर्वजण धर्माच्या बाजूने उभे रहा. यावेळी व्यासपीठावर गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणराव डोंगळे, राष्ट्रवादीचे राधानगरी तालुका अध्यक्ष किसनराव चौगुले, भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर, केडीसीसी बँकेचे संचालक रणजिसिंह पाटील, आनंदराव आतवडे आदी प्रमुख उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes