कसबा बावडा - लाईन बझार परिसरात जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा
schedule17 Sep 25 person by visibility 205 categoryगुन्हे

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कसबा बावडा लाईन बझार परिसरामध्ये सर्व जाती- धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने व बंधु भावाने राहत आहेत. येथील शांतता व सौहार्दपूर्ण वातावरण विनाकारण जाणूनबुजुन दूषित करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत. जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दिली. जिल्हा पोलिस प्रमुखांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘सध्या समाजमाध्यावर "दि कसबा बावडा फाईल्स" या मथळ्याखाली जातीय तेढ निर्माण करणारी चुकीची पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे. याचे परिणाम संपूर्ण समाज मनावर होऊन दसरा, दिवाळी व निवडणूकीच्या तोंडावर समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तेव्हा समाज माध्यावरील पोस्टचाशोध घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच कसबा बावडा व लाईन बझार परिसरातील सर्व मंदिरे, धार्मिक स्थळे, ऐतिहासिक स्थळांवर पोलीस बंदोबस्त ठेवावा.’