Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठारकेआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंद

जाहिरात

 

आयआरसीटीसीतर्फे ऑक्टोबरमध्ये रेल्वेद्वारे उत्तर भारत देवभूमी यात्रा

schedule12 Sep 25 person by visibility 531 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम (आयआरसीटीसी)कार्पोरेशनतर्फे भारत गौरव टुरिस्ट ट्रेन योजनेंतर्गत चार ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा’पर्यटनाची घोषणा करण्यात आली आहे. या यात्रेतंर्गत या धार्मिक-ऐतिहासिक वास्तूंना भेटी देण्यात येणार आहेत. ११ रात्र आणि बारा दिवसाचा हा सर्वसमावेशक रेल्वे प्रवास सुमारे पाच हजार किलोमीटरचा आहे. अशी माहिती आयआरसीटीसीचे पर्यटन विभागाचे कार्यकारी अधिकारी अमोल हळदणकर यांनी दिली.

या प्रवासासाठी प्रस्थान आणि परतीचे मागे कोल्हापुरातून आहे.या प्रवासात हरिद्वार-ऋषिकेश आणि गंगा आरती, अमृतसर येथील सुवर्ण मंदिर आणि वाघा बॉर्डर समारंभ ठिकाणी भेट आहे. कटरा येथे वैष्णोदेवी दर्शन, मथुरा आणि वृदांवन-कृष्णजन्मभूमीचे दर्शन घेता येईल आग्रा येथील ताजमहालला भेट आहे. या पर्यटन रेल्वेमध्ये स्लीपर क्लास, ३एसीं आणि २एसीची सुविधा आहे. रेल्वेत अत्याधुनिक स्वयंपाकघर आहे, प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षक आहेत. या रेल्वेत ७५० प्रवाशांची सोय होऊ शकते. इकॉनॉमी क्लाससाठी (स्लीपर) १९,८९० रुपये, स्टॅडर्ड (3एसी) क्लाससाठी ३३,५६० रुपये आणि कम्पर्ट क्लाससाठी (२एसी) ४४, ४६० रुपये तिकिट दर आहे.

या प्रवासात सकाळी नाष्टा, दुपारी व रात्री जेवणाची सुविधा आहे. अधिक माहितीसाठी आयआरसीटीसी टुरिझम ऑफिस प्लॅटफॉर्म नंबर १ कोल्हापूर रेल्वे स्टेशन (मो.क्र.८२८७९३१८८६) येथे संपर्क साधावा. उत्तर भारत देवभूमी यात्रेसाठी आतापर्यंत २५० हून अधिक भाविक व पर्यटकांनी बुकिंग केले आहे. रेल्वेतर्फे आयोजित या यात्रेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेवेळी आयआरसीटीसीचे विजय कुंभार, रेल्वे समिती सल्लागाार शिवनाथ बियाणी, उदयसिंह निंबाळकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes