Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शक्तीपीठसाठी संवादातून सहमतीचे पाऊल उचलू, शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई : आमदार राजेश क्षीरसागरतर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या विचार कार्यावर  आंतरराष्ट्रीय चर्चासत्रशिक्षणाच्या व्यापक हितासाठी सामूहिक आंदोलनाचा कोल्हापुरी पॅटर्न ! जाचक संचमान्यतेच्या विरोधात पुकारला लढा !!शिवकालीन बारा किल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन ! पन्हाळा, रायगड, प्रतापगडचा समावेश शक्तीपीठ महामार्गवरुन शेतकऱ्यांमध्ये संभ्रम पसरविण्याचा विरोधकांचा प्रयत्न : आमदार राजेश क्षीरसागरमहानंदा मोहिते यांच्या घुंगुरमाळा कवितासंग्रहाचे शनिवारी प्रकाशनआई अंबाबाई, शक्तिपीठ महामार्ग रद्द होऊ दे ! शेतकऱ्यांची शेती वाचू दे !!शिक्षक - संस्था चालकांनी उगारली आंदोलनाची छडी ! अन्यायी संच मान्यतेच्या विरोधात कोल्हापुरात जंगी मोर्चा !!कोल्हापुरात वंध्यत्व विषयक दोनदिवसीय कार्यशाळानूतन मराठी विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी

जाहिरात

 

जरगनगरातील प्री-प्रायमरी स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा

schedule11 Jul 25 person by visibility 201 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जरगनगर विद्यामंदिर परिसरातील प्री-प्रायमरी स्कूल येथे गुरुपौर्णिमेनिमित्त अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. स्कूलच्या संचालिका वृंदा घाटगे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या आजी-आजोबांच्या चरणांचे पूजन करून त्यांना वंदन केले.कुटुंबात आपुलकी आणि जिव्हाळा कमी होत असतानाच, वृद्ध व्यक्तींप्रती प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी सौ.वृंदा घाटगे प्री-प्रायमरी स्कूलचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकाचा विषय ठरत आहे. जवळपास २०० बालचमुंनी आपल्या आजी-आजोबांसोबत तसेच आई-वडिलांच्या उपस्थितीत पाद्यपूजन केले. यावेळी कार्यक्रमाला जरग विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका सौ.नीता ठोंबरे, शिक्षकवृंद, तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes