महाद्वार रोड व्यापारी-रहिवासी असोसिएशनतर्फे डॉ जयंत नारळीकरांना अभिवादन
schedule23 May 25 person by visibility 36 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील महाद्वार रोड व्यापारी व रहिवासी असोसिएशनतर्फे कोल्हापूरचे सुपुत्र, आंतरराष्ट्रीय किर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाद्वार रोड येथील नारळीकर भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष शामराव जोशी यांनी कोल्हापूरचे महान सुपुत्र व महाद्वार रोडचे रहिवासी ख्यातनाम शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे चिरंतन स्मारक कोल्हापूरात व्हावे अशी मागणी केली. भाजपचे सचिव अशोक देसाई, असोसिएशनचे कार्याध्यक्ष भालचंद्र लाटकर, सेक्रेटरी डॉ. गुरुदत्त म्हाडगुत, उमेश लाटकर, मालोजी केरकर, हेमंत आराध्ये, शिवनाथ पावसकर, किरण धर्माधिकारी, अमित माने, केदार पारगावकर, अमित निगवेकर, पियुष जाधव, धवल पोवार, अनुजा भोसले , भाग्यश्री अध्यापकर उपस्थित होते.