आयटी पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेस सरकारची मंजुरी -आमदार राजेश क्षीरसागर
schedule13 Dec 25 person by visibility 78 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्ह्यात आय.टी.पार्क स्थापनेसह जागा उपलब्धतेच्या प्रस्तावास सरकारने मंजुरी दिली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे. याबद्दल मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. कोल्हापूरला आयटी क्षेत्रासाठी चांगली संधी आहे. हेच क्षेत्र वाढविण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे. आयटी क्षेत्रासाठी कोल्हापूर शहर पूरक असतानाही जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले आहे. आयटी क्षेत्र झाल्यास सुमारे हजारोंच्या संख्येत रोजगार निर्मिती होणार आहे. याचा फायदा कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक युवक- युवतींना होणार आहेच. त्याचबरोबर पर्यायाने कोल्हापूरच्या आर्थिक उत्पन्नात भर होणार आहे. कोल्हापुरात आय.टी. पार्क निर्माण करण्यासाठी जागा देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे प्रलंबित होते. याबाबत आमदार क्षीरसागर यांनी गत पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्नाद्वारे विधिमंडळाचे लक्ष वेधले होते. या प्रश्नावर उत्तर देताना राज्यमंत्री नाईक यांनी बैठक घेवून प्रश्न मार्गी लावण्याबाबत सभागृहास आश्वासित केले होते. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यास यश आले असून, आय.टी.पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे.