शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार न दिल्यास तीव्र आंदोलन – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील
schedule17 Oct 25 person by visibility 72 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यांच्याकडे प्रशासन व सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दोन तास मूक आंदोलन करण्यात आले. अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत मिळावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी ते बोलत होते. यावेळी अनिल घाटगे, बाजीराव खाडे, सुनील देसाई, महादेव पाटील, निरंजन कदम, गणेश जाधव फिरोज सरगूर, पप्पू जाधव, रियाज कागदी आदी उपस्थित होते. पक्षातर्फे जिल्ह्यातील सगळया तहसिलदार कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले