Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
इच्छुकांची स्थायीसाठी तयारी, माधुरी किरण नकातेनी घेतली आमदारांची भेट कॉलेजने केले अर्थसहाय्य, राष्ट्रीय स्पर्धेत विद्यार्थ्याकडून केआयटीचा डंकाघोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान डॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपसचिन पाटलांच्या उमेदवारीला मिळतेय मतदारांची पसंती, तरुण नेतृत्वात विकासकामाची धडाडीहाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!मेरी वेदर मैदानावर तेरा फेब्रुवारीपासून भीमा कृषी प्रदर्शनमहापौर-उपमहापौरपदाचे उमेदवार ठरले !  सभागृहात महायुतीच्या विरोधात काँग्रेस लढणार! !काँग्रेस लढणार महापौर- उपमहापौरपदाची निवडणूक ! सचिन शेंडे, दुर्वास कदम उमेदवार !!शिक्षणाचा कोल्हापूर मनपा पॅटर्न राज्यात भारी ! शिष्यवृत्तीची रक्कम पाच हजार करणारी एकमेव महापालिक!!

जाहिरात

 

योगदान विसरू नका, महापालिकेत शिवसेना ठाकरे पक्षाला हव्यात 33 जागा

schedule06 Dec 25 person by visibility 209 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. कोल्हापूर महापालिकेसाठी शिवसेनेला 33 जागा हव्यात. शिवसेनेने यापूर्वी महाविकास आघाडीसाठी मोठे योगदान दिले आहे. ते योगदान महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी विसरू नये अशी स्पष्ट भूमिका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मांडली. आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी त्यांची शाहू स्मारक भवन येथे पत्रकार परिषद झाली . शहर प्रमुख सुनील मोद,  माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे,  मनजित माने आदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत जिल्हाप्रमुख इंगवले यांनी महापालिका निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून  लढविण्यात येणार आहे. असे स्पष्ट केले. ते म्हणाले,  महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडे सक्षम उमेदवार आहेत. आता उपलब्ध माहितीनुसार 33 ठिकाणी शिवसेनेचे अतिशय प्रभावी उमेदवार आहेत. महाविकास आघाडीला शिवसेनेने नेहमीच योगदान दिले आहे. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत तत्कालीन उमेदवार जयश्री जाधव, लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराज तर गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुवकीत राजेश लाटकर यांच्या प्रचारात  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींना या योगदानाचा विसर पडू नये. महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी शहरांमध्ये विकास कामासाठी जो निधी दिला त्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागात विकास कामासाठी किती निधी उपलब्ध करून दिला ?  याचा विचार करावा. दुजाभाव होऊ नये. शिवसेनेचा वापर कोण करत आहे का ?याचाही विचार करावा असेही इंगवले यांनी स्पष्ट केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes