Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डॉ. गणपती कमळकर यांच्या पुस्तकाचे रविवारी प्रकाशनछत्रपती शिवाजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेतर्फे शनिवारी सभासदांना दिपावली भेटवस्तू वाटपगग गगख खख मनस्वी महिला समूहातर्फे रविवारी महिला शिक्षकांचा मेळावा, सत्कार सोहळाजयवंत महाविद्यालयाच्या पेटंट डिझाईनवर भारत सरकारची मंजुरीची मोहोरग्रामीण विद्यार्थ्यांसाठी एआयची कार्यशाळा, केएम फाऊंडेशनच्या माध्यमातून कळंब्यात उपक्रमगोकुळ अध्यक्ष निवडीचा वाद पोहोचला कोर्टात, समविचारी आघाडीची याचिका! शशिकांत पाटलांची निवड वैध ठरवा ! !पेटाळयाचा मास्तर…!लोकमंगलच्या माध्यमातून करवीरवासियांना बँकिंगच्या अधिकाधिक सुविधांची उपलब्धता

जाहिरात

 

गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट ! दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी जमा !

schedule30 Oct 26 person by visibility 140 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत यंदाही दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादकांना मोठी आर्थिक भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील म्हैस व गाय दुधाच्या अंतिम दूध दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपयाची रक्कम दि. १९ ऑक्टोबर २०२६ रोजी प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. दूध उत्पादक शेतकरी हेच गोकुळचे केंद्रबिंदू असून, त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी संघ कटिबद्ध असल्याची माहिती संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी दिली.

आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये दि. ०१/०४/२०२५ ते ३१/०३/२०२६ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे (३.८१ टक्के) व गाय दुधास (दूध उत्पादकास) सरासरी प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे (३.५१ टक्के) याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात आला आहे. दूध संस्थांसाठी प्रतिलिटर सरासरी २० पैसे याप्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्स खाती जमा करण्यात आले आहेत. गोकुळ संघामार्फत प्रतिवर्षी दिवाळीस अंतिम दूध दर फरक दिला जातो. त्यानुसार यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता ६३ कोटी १२ लाख ११ हजार रुपये, तर गाय दुधाकरिता ३९ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये व डिबेंचर व्याज ६.५० टक्के प्रमाणे ११ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये, असे एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थांच्या खात्यावर बँकेत जमा केली आहे. तसेच लाभांश (डिव्हीडंड) ११ टक्के प्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर अदा केले जाईल.    

      या दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील गोकुळ संलग्न ८ हजार दूध संस्थांच्या सुमारे ५ लाख दूध उत्पादक सभासदांना होणार आहे.    गोकुळने प्रतिदिनी दूध संकलनाचा २० लाख लिटरचा टप्पा ओलांडला असून, दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात सणानिमित्त २५ लाख ४५ हजार लिटरची दूध विक्री केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षामध्ये दूध पुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास ६१ रुपये ९८ पैसे, तर गाय दूध उत्पादकास ३७ रुपये ५३ पैसे इतका उच्चांकी सरासरी दूध दर अंतिम दर फरकासह मिळाला आहे.  गोकुळची २०२५-२६ मध्ये ४,१८५ कोटी रुपये वार्षिक उलाढाल झाली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes