Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गणेशोत्सव... माय मराठीचा गजर अन पुस्तकाची निर्मिती ! छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळाची बातच न्यारी !!गोकुळमध्ये राष्ट्रवादीच मोठा भाऊ, महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटेल ! मुख्यमंत्री मार्ग काढतील !! - मंत्री हसन मुश्रीफ'दिलखुलास’मध्ये  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांची विशेष मुलाखतजिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदानभाऊसिंगजी रोडवरील जागा विकसितचा निर्णय सतरा सप्टेंबरच्या बैठकीतकोल्हापूर महापालिकेने केली पाणीपट्टीत वाढ, एक ऑक्टोबरपासून अंमलबजावणीजिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या संचालकपदी प्रकाश पाटीलरानभाजी महोत्सवला जोरदार प्रतिसाद, दिवसभरात एक लाखाहून अधिक उलाढाल गोकुळसाठी 18 ऑक्टोबरला मतदान, 19 ऑक्टोबरला मतमोजणीगोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर होणार

जाहिरात

 

जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन ४०० शिक्षक, नियुक्ती पत्रे प्रदान

schedule10 Sep 26 person by visibility 1771 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेला ४०० नवीन शिक्षक मिळाले. समुपदेशनद्वारे या शिक्षकांच्या नियुक्तीचे ठिकाणे निश्चित केली. गुरुवारी, दहा सप्टेंबर २०२६ रोजी त्यांना नियुक्तीचे पत्रे देण्यात आली. जिल्हा परिषदेत दिवसभर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू होती. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया झाली. पवित्र पोर्टल अंतर्गत ४१० शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली. पाच शिक्षक गैरहजर राहिले. उर्वरित ४०५ शिक्षकांचे समुपदेशन झाले. समुपदेशन झाल्यानंतर गुणवत्तेनुसार नियुक्तीची ठिकाणे निवडण्याची संधी देण्यात आली. रिक्त् जागांची ठिकाणे दर्शविण्यात आली. सायंकाळी उशिरा शिक्षकांना नियुक्तीची पत्रे देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत, शिक्षण समिती सभापती शीतल यादव यांनीही या ठिकाणी भेट दिली. प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी अशोक घुगे यांच्यासह शिक्षण विभागाने भरती प्रक्रियेसंबंधी नियोजन केले. दरम्यान विविध शिक्षक संघटनेचे नेतेमंडळींनी भरती प्रक्रिये दरम्यान जिल्हा परिषदेत थांबून होते. भरती प्रक्रियेनंतर नवीन शिक्षकांचे अभिनंदनही केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes