राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी बाजीराव खाडे
schedule04 Dec 25 person by visibility 110 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी बाजीराव खाडे यांची निवड झाली आहे. यानिमित्त खाडे यांचा पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा व शहर कमिटीच्यावतीने जिल्हाध्यक्ष व्ही बी पाटील यांच्या हस्ते व शहराध्यक्ष आर के पोवार यांच्या अध्यक्षतेखाली शाहू स्टेडियम येथील पक्ष कार्यालयात सत्कार झाला. सत्कारास उत्तर देताना खाडे यांनी जिल्हा, शहर, राज्य तसेच राष्ट्रीय नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत पक्षाचे काम प्रामाणिक पणे व चिकाटीने करण्याची ग्वाही दिली. शहर सरचिटणीस सुनिल देसाई यांनी स्वागत केले कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी आभार मानले.कार्यक्रमास महिला अध्यक्षा पद्माताई तिवले, युवक अध्यक्ष मकरंद जोंधळे, श्रीकांत पाटील, गणेश जाधव, निरंजन कदम, रियाज कागदी, प्रशांत पाटील, हिदायत मणेर, रामराज बदाले, फिरोज सरगूर उपस्थित होते.