Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटीचे १५६ कर्मचारी सेवेत कायम, राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा ! कर्मचाऱ्यांचा शिवालयावर जल्लोष ! !राष्ट्रवादी शरद पवार पक्षातर्फे उमेदवारी मागणी अर्जास प्रारंभकोल्हापुरात शुक्रवारी एमएसएमई कॅपॅसिटी बिल्डिंग समिट २०२५-२६जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार ! धनंजय महाडिककोल्हापूर-इचलकरंजी महापालिकेसाठी 15 जानेवारीला मतदान ! 16 जानेवरीला मतमोजणी ! !चिकोडे ग्रंथालयात 860 रक्तदात्यांनी केले रक्तदान महापालिका निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक आयोगाची दुपारी पत्रकार परिषद समाजातील कर्तबगारांची आदर्शवत कामगिरी नव्या पिढीसाठी प्रेरणादायी- निवेदिता मानेचित्रकार भाऊसो पाटील यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शनशिवसेना ठाकरे पक्षाचा ३३ जागांचा प्रस्ताव, काँग्रेस समितीसोबत प्राथमिक चर्चा

जाहिरात

 

तीन देशातील फुटबॉल मूल्यांकनासाठी अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती

schedule29 Nov 25 person by visibility 179 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एशियन फूटबॉल फेडरेशनच्या एलिट यूथ स्कीम अंतर्गत कंबोडिया, भूतान आणि लेबनॉन या देशांच्या एलिट यूथ डेव्हलपमेंट रचनेचे मूल्यांकन करण्यासाठी युवा पॅनेलवरील प्रमुख सदस्य म्हणून अंजू तुरंबेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आशियातील फुटबॉल खेळणाऱ्या देशांमध्ये सक्षम, शाश्वत आणि सर्वांगीण युवक फुटबॉल विकास व्यवस्था निर्माण करण्यासाठी फेडरेशन प्रयत्नशील आहे. या पॅनेलवरील भारतातून एकमेव सदस्य असलेल्या अंजू यांनी त्यांच्या सहकारी मूल्यांकनकर्त्यांसह ऑफलाइन मूल्यांकन प्रक्रियेची सुरुवात केली आहे. जीहून किम (कोरिया) – लेबनॉन, ताकेशी ओनो (जपान) – कंबोडिया आणि विथया लाखाकुल (थायलंड) – भूतान हे अन्य सदस्य आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात त्या कंबोडिया आणि भूतानमध्ये ऑन-साइट मूल्यांकनासाठी भेट देत आहेत. या भेटींमध्ये प्रत्येक देशाच्या युवक विकास कार्यक्रमाला मजबुती देण्यासाठी सखोल ऑन-फील्ड निरीक्षणे आणि मूल्यांकनांचा समावेश आहे. या प्रक्रियेदरम्यान त्या प्रत्येक फुटबॉल फेडरेशनच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधून विद्यमान व्यवस्था, त्यातील आव्हाने आणि भविष्यातील विकास दिशा यांचा सखोल अभ्यास करतील. तुरंबेकर म्हणाल्या, ‘एशियन फुटबॉल फेडरेशनने माझ्यावर ठेवलेला विश्वास माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. आशियातील सर्वांगीण फुटबॉल विकासासाठी अर्थपूर्ण योगदान देणे हेच माझे ध्येय आहे. विविध देशांतील सहकाऱ्यांसोबत काम करणे ही माझ्यासाठी मोठी संधी आणि आशीर्वाद आहे. माझे अनुभव आणि ज्ञान शेअर करून मी प्रत्येक देशाला शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.”

 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes