आदिती नरकेची कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन संघात निवड
schedule03 Oct 25 person by visibility 107 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन : कसबा बावडा येथील डॉ.डी. वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्युटर शाखेची विद्यार्थिनी आदिती महादेव नरके हिची १९ वर्षाखालील मुलींच्या कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन संघात निवड झाली आहे. वसई येथे दिनांक ४ ऑक्टोबर पासून या स्पर्धा होणार आहेत.
या निवडीसाठी कोल्हापूर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष सतीश घाटगे यांचे प्रोत्साहन आणि तन्मय करमळकर यांचे मार्गदर्शन लाभले.या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी.पाटील, ट्रस्टी ऋतुराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ.ए. के.गुप्ता, प्राचार्य डॉ.एस.डी. चेडे यांनी तिचे अभिनंदन केले.