जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना केंद्रीय गृहखात्याकडून पदक
schedule01 Jan 21 person by visibility 358 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना भारत सरकारच्या गृह खात्याचा ‘असाधारण असूचना कुशलता पदक’जाहीर झाले आहे. बलकवडे यांनी गडचिरोली येथे नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल केंद्रीय गृह खात्यातर्फे त्यांचा सन्मान होणार आहे.
बलकवडे यांनी २०१८ ते २०२० या कालावधीत गडचिरोली येथे पोलिस अधीक्षकपद म्हणून काम केले आहे. त्यांच्या पोलिस अधीक्षकपदाच्या कालावधीत गडचिरोलीतील नक्षलवादावर अंकुश ठेवला होता. त्या जिल्ह्यातील निवडणुका शांततेने पार पाडल्या होत्या. त्यांच्या पथकाने नक्षलींचे दहा कँम्प उद्धवस्त केले होते. तसेच वीस नक्षलवाद्यांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या दोन वर्षाच्या तिथल्या कालावधीत ४५ नक्षलींनी आत्मसमपर्ण केले होते. याशिवाय त्यांनी, ३० गावातील दळणवळणासाठी पुलाचे बांधकाम करण्यासाठी सुरक्षा व्यवस्था निर्माण केली होती. त्यांच्या या साऱ्या कामगिरीचा गौरव केंद्रीय गृह खात्याने केला आहे. राज्य सरकारनेही त्यांच्या सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर केले आहे.