Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सिटी इंजिनीअरच्या नियुक्तीत मंत्र्यांचा हस्तक्षेप ! नगरविकासचे महापालिकेला पत्र  !! जिल्ह्यातील १४३ शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर संस्काराचे बीजारोपणडीवाय पाटील स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या ४१ विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवडविनाअनुदानित शिक्षकांच्या आंदोलनाचा आवाज वाढला ! शरद पवार, उद्धव ठाकरेंचा पाठिंबा !!जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धांना प्रारंभ, ३२६ खेळाडूंचा सहभागविरोधी पक्षनेतेपदासाठी इंडिया आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन, सरकारवर टीकास्त्रनियमित सभासदांना पन्नास लाखापर्यंत कर्ज मर्यादा-करवीर शिक्षक पतसंस्थेचा निर्णयशिवाजी विद्यापीठातर्फे कृत्रिम बुद्धिमत्तेवरील पुस्तकाची निर्मिती ! कुलगुरू शिर्केसह तीन संख्याशास्त्रज्ञांनी केले लेखन !!बॅडमिंटन असोसिएशनतर्फे कोल्हापुरात पाच दिवस जिल्हास्तरीय स्पर्धानगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रशासकांच्या आदेशाला केराची टोपली- कोल्हापूर नेक्स्टचा आरोप

जाहिरात

 

विरोधी पक्षनेतेपदासाठी इंडिया आघाडीचे कोल्हापुरात आंदोलन, सरकारवर टीकास्त्र

schedule09 Jul 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यात विरोधी पक्षनेता नसणे हे लोकशाहीसाठी लाजिरवाणे आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर येऊन दुसरे पावसाळी अधिवेशन होत आहे. मात्र सरकारकडून विरोधी पक्षनेतेपदाबाबत कार्यवाही होत नाही. घोटाळे बाहेर येण्याच्या भीतीने सरकार विरोधी पक्षनेतेपदाबाबत टाळाटाळ करत आहे असे टीकास्त्र सोडत कोल्हापुरात इंडिया आघाडीतर्फे जोरदार आंदोलन झाले. राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथे मंगळवारी (८ जुलै) धरणे आंदोलन करण्यात आले. याठिकाणी महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.

 काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, प्राचार्य टी. एस. पाटील यांची भाषणे झाली. विरोधी पक्षनेतेपद तत्काळ द्यावे अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील,  शिवसेना जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगले,माजी नगरसेवक विक्रम जरग, ईश्वर परमार, रवी आवळे, शिक्षक नेते भरत रसाळे, कॉम्रेड दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, अतुल दिघे, रघुनाथ कांबळे, सुभाष देसाई, संदीप देसाई, शेकापचे बाबासाहेब देवकर, डी. जी. भास्कर, शिवसेना ठाकरे गटाचे विराज पाटील, अवधूत साळोखे, राजू यादव, सुनील देसाई, रियाज सुभेदार, शिवानंद बनछोडे, आदींचा सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes